कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशास सुरवात
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशास सुरवात 
मुख्य बातम्या

कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशास सुरवात

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ३० जुलैपासून राबविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने दिलेल्या केटीपीएलच्या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने ९ आॅगस्टपर्यंत अर्ज भरावा. त्यानंतर २८ आॅगस्टपासून प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू होईल. विशेष म्हणजे प्रवेशासाठी शासकीय सुटीच्या दिवशीही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. कृषी विद्यापीठामार्फत पदव्युत्तर पदवीचे कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्स्यविज्ञान, अन्नतंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, एमबीए (कृषी) हे काढणी पश्च्यात व्यवस्थापन हे अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत या अभ्यासक्रमाची ३८ महाविद्यालये आहेत. यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ ११, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ११ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ ७ अशी महाविद्यालये आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम हा दोन वर्षे कालावधीचा असून या महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १३३८ एवढी आहे. यापैकी ३३ महाविद्यालये शासकीय व पाच महाविद्यालये कृषी विद्यापीठ अनुदानित आहेत.  विद्यार्थ्यांनी अर्ज करताना एकच प्रवेश अर्ज करावा. एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज दाखल केल्यास शेवटचा दाखल केलेला प्रवेश अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरल्यानंतर स्वाक्षरी, उमेदवारांचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड कराव्यात. अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रत व त्यासोबत कोणतेही कागदपत्रे कृषी परिषदेकडे पाठवू नयेत. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळ, पुणे यांच्याकडून सामायिक प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. प्रत्येक विद्याशाखेस स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहे. संबधित विद्याशाखेची पदवी किमान ५.५ सीजीपीए गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सामायिक प्रवेश परिक्षेचे ७० टक्के गुण आणि पदवीचे ३० टक्के गुण विचारात घेऊन किमान ५.५ सीजीपीए गुण खुल्या वर्गातील उमेदरावाराकरिता आणि ५.०० सीजीपीए गुण आरक्षित उमेदवारांना अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासंबंधीचे माहितीपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. याअतंर्गत www.maha.agriadmission.in या संकेतस्थळार प्रवेशोच्छुक उमेदवारांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT