मुख्य बातम्या

‘कृषी सुधारणा समिती‘ दोन महिन्यांत अहवाल देणार

टीम अॅग्रोवन

पुणे ः कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांच्या कामकाजातील अनियमिततेमुळे अडचणीत आलेल्या संस्थांबाबत निर्णय घेण्याबराेबरच इतर संस्थांच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा करण्यासाठी पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्रक्रिया संघाचा अभ्यास करून करावयाच्या उपाययाेजनांची शिफारस दाेन महिन्यांत शासनाला करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. राज्यातील कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम याेजनेअंतर्गत शासन हमीवर अर्थसाह्य करण्यात आले आहे. मात्र काही संस्थांनी शासनाच्या धाेरणात्मक निर्णयाचे उल्लंघन केल्याने अनेक संस्था अार्थिक अडचणीत आल्या तर काही संस्था अवसायनात काढण्यात आल्या. या विविध संस्थांचा अभ्यास करून संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासनााला विविध उपाय, शिफारशी समिती करणार आहे. समितीमध्ये काेकण विभागाच्या विभागीय सहनिबंधक ज्याेती लाटकर, सहसंचालक (प्रक्रिया) बी. एस. जाधव आणि सदस्य सचिवपदी काेल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  समितीने संस्था स्थापनेचा उद्देशाची पूर्तत झाली का, उद्देश साध्य करताना संस्थेला आलेल्या अडीअडचणी, शासकीय अर्थसाह्याचा विनियाेग व झालेली वसुली, संस्थांनी केलेले उल्लेखनीय काम, राेजगारनिर्मिती, संस्थांनी केलेले गैरव्यवहार, गैरव्यवहारांवर केलेली कारवाई, अवसायनात गेलेल्या संस्थाचे पुनरुज्जीवन, गुणात्मक वाढीसाठी करावयाच्या उपाययाेजना आणि शासनाने घ्यावयाचे धाेरणात्मक निर्णय आदी विविध मुद्द्यांवर समिती अहवाल सादर करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT