The agitation will sit next to the leopard cages
The agitation will sit next to the leopard cages 
मुख्य बातम्या

बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार आंदोलन !

टीम अॅग्रोवन

मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. या क्षेत्रांतील घरांसाठी व कृषिपंपांसाठी महावितरण कंपनीने वीजजोड प्राधान्याने द्यावा. पंपांना बारा तास वीज पुरवठा करावा, आदी प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यांशेजारीच सोमवार १७ ऑगस्टपासून रात्रंदिवस आंदोलन करण्याचा इशारा ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी दिला आहे.

एकलहरे (ता. आंबेगाव) येथे पत्रकार परिषदेत औटी बोलत होते. यावेळी जिल्हा ऊर्जा समितीचे प्रमुख नितीन मिंडे, डॉ. बाळकृष्ण घंगाळे, जगन्नाथ खोकराळे, अशोक भोर, सुभाष मावकर, वैशाली अडसरे उपस्थित होते. आंबेगाव जुन्नर तालुक्‍यातील पंचवीस गावात ज्या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे. तेथे कोपी करून ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते उपोषण करून आंदोलन करणार आहेत.

ग्रामपंचायतीने स्ट्रीट लाइट थकबाकी भरल्याशिवाय नवीन वाढीव वीज जोडणी देण्यात येऊ नये, असे परिपत्रक १४ मे २०१८ रोजी महावितरणने काढले आहे. सदर परिपत्रक तत्काळ रद्द करावे. जुन्नर तालुक्‍यात पथदिव्यांचा सहा हजार ६८० तर आंबेगाव तालुक्‍यात विजेचे दोन हजार ७५७ खांब मंजूर झालेले आहेत. पण सदर परिपत्रकामुळे अनेक ग्रामपंचायती स्ट्रीटलाइटची कामे थांबली आहेत.

कृषी पंप व घरगुती वीज ग्राहकांची वीजबिले दुरुस्त केल्यानंतर अचूक वीजबिलाचे आधारित दंड, व्याज, माफ व मुद्दल बिलाच्या ५० टक्के सवलत देणारी नवी कृषी संजीवनी योजना राबवावी. राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलेल्या दरमहा घरगुती वीज ग्राहकांसाठी १०० युनिटच्या आतील ग्राहकांना मोफत वीज या घोषणेची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT