परभणी जिल्ह्यात आंदोलन
परभणी जिल्ह्यात आंदोलन 
मुख्य बातम्या

`जायकवाडी`च्या आवर्तनासाठी परभणी जिल्ह्यात आंदोलन

टीम अॅग्रोवन

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी आवर्तन सोडण्यात यावे, जनावरांना दावणीवर चारा उपलब्ध करून देण्यात यावा, यांसह विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच अखिल भारतीय किसान सभा यांच्यातर्फे मंगळवारी (ता. ८) जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात उद्भभवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बी पिकांच्या सिंचनासाठी, जनावरांसाठी, पिण्यासाठी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातील पाण्यावर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ७५ टक्के हक्क आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यातून डाव्या कालव्याव्द्वारे पाच पाणी आवर्तने सोडण्यात यावीत. दुष्काळामुळे चारा उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांना जनावरांचा सांभाळ करण्यासाठी दावणीवर चारा उपलब्ध करून द्यावा. पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना तत्काळ विमा परतावा मंजूर करण्यात यावा. तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७८७५ रुपयांप्रमाणे अग्रीम विमा परतावा तत्काळ देण्यात यावा. उसाला एफआरपीनुसार पहिली उचल २ हजार ५० रुपये देण्यात यावी. महाराष्ट्र शुगर्स कारखान्याकडील ४४ कोटी रुपये, गंगाखेड शुगर्स कारखान्याकडील प्रतिटन ५५० रुपये याप्रमाणे तसेच जय महेश शुगर्स कारखान्याकडील ७४ कोटी रुपये थकीत ऊसबिल तत्काळ देण्यात यावे.

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना सरसकट प्रतिव्यक्ती ३५ किलो गहू, तांदूळ, डाळ आदी धान्य देण्यात यावे आदी मागण्यांसाठी अखिल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि भारतीय किसान सभेतर्फे विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली पोखर्णी फाटा (ता. परभणी) आणि पाथरी या ठिकाणी चक्का जाम तर मानवत येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT