मागण्यांसाठी आंदोलन करताना `स्वाभिमानी`चे कार्यकर्ते आणि शेतकरी
मागण्यांसाठी आंदोलन करताना `स्वाभिमानी`चे कार्यकर्ते आणि शेतकरी 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जळगाव जामोदला ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  : पिकांच्या पंचनाम्यांचे थोतांड बंद करून तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा; सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका व इतर पिकांसाठी हेक्‍टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात विनाविलंब जमा करावी, जाचक अटी न लावता पिकविमा मंजूर करावा आदी मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता. ४) आंदोलन केले.

सार्वत्रिक नुकसान झाले असताना पंचनामे करण्याचे वेळकाढू धोरण शासनाने अवलंबले असून, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा जास्त अंत न पाहता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासाठी ‘स्वाभिमानी’ने महाआंदोलनाचा पवित्रा घेत प्रशासनावर रोष व्यक्त केला. निवेदने, मोर्चे, विनंत्या सर्व काही करून शासन दरबारी शेतकऱ्यांची दखल घेतली जात नसल्याने अखेर हातात विषाच्या बाटल्या घेऊन शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय गाठले आणि कार्यालयासमोर निदर्शने करून मागण्यांसंदर्भात घोषणा दिल्या. हे आंदोलन विकोपाला जाऊ नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. या वेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तत्काळ वरिष्ठांकडे अहवाल देऊ, शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी तालुकाध्यक्ष नितीन पाचपोर, शहराध्यक्ष अक्रम दौला, सैयद बाहोद्दीन, अनंता मानकर, वैभव वानखडे, शिवदास खिरोडकार, सुपेश वाघ, समाधान धुर्डे, स्वप्निल भगत, सागर दयाल, राजेश दाभाडे, शाम मुळे, गोपाल भिसे, भैया देशमुख, रोशन मानकर, संतोष तेल्हारकर, उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे लोळ; मुख्यमंत्री धामींच्या लष्कराची मदत घेण्याच्या प्रशासनाला सूचना

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

SCROLL FOR NEXT