धनगर आरक्षणासाठी गेवराईत धरणे आंदोलन
धनगर आरक्षणासाठी गेवराईत धरणे आंदोलन 
मुख्य बातम्या

धनगर आरक्षणासाठी गेवराईत धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

गेवराई : धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासह समाजाच्या विविध प्रश्नांवर शुक्रवारी (ता. 10) येथे दुचाकी फेरी काढून तहसिल कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले.   धनगर समाजाला अनुसूचित जमातीप्रमाणे आरक्षण द्यावे, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिलेले असून त्याची अंमलबजावणी करावी, आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या परमेश्वर घोंगडे यांच्या कुटुंबियाला पन्नास लाख रुपयांची मदत द्यावी, धनगर सामाजाच्या विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती वाटप करावी, शेळी - मेंढी विकास महामंडळास पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दुचाकी फेरी काढून ग्रामीण भागातील समाजाचे तरुण आंदोलनात सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT