आंदोलन करताना शिवसेनेचे कार्यकर्ते
आंदोलन करताना शिवसेनेचे कार्यकर्ते 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आखाडा बाळापूर येथे शिवसेनेचे आंदोलन

टीम अॅग्रोवन

आखाडा बाळापूर, जि. हिंगोली  ः पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आखाडा बाळापूर येथे सोमवारी (ता. ४) एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

येथील बस स्थानकासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, जिल्हा उपसंघटक सोपान बोंढारे, उपसभापती अजय सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डी. के. दुर्गे, उपसरपंच विजय बोंढारे, राहुल पतंगे, दत्तराव माने, नथूजी तावडे, बालाजी बोंढारे, मोहनसिंह बायस, यशवंत पंडित, तुळशीराम वाघमारे, प्रभाकर गवारे, सचिन पेंढारकर, विजय गंगेवार, रूपेश व्यवहारे, शंकर सूर्यवंशी, शिवचरण गोयंका, बी. एम. देवकर, गजानन अवचार, भगवान पंडित, माधव बेनगर, प्रशांत देशमुख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे एक तास चाललेल्‍या या आंदोलनामुळे नांदेड व हिंगोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT