शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’ची निदर्शने
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’ची निदर्शने 
मुख्य बातम्या

शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’ची निदर्शने

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी (ता.२) विभागीय आयुक्‍तालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्यासंदर्भात विभागीय आयुक्‍तांना निवेदनही सादर करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील केलेल्या या अांदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे, माउली मुळे, चंद्रकांत कटारे, मानिक कदम, विजय भंडे, विजय वैद्य, संपत रोडगे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कपाशीवरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी सव्वा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, कपाशी बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, उसाला पहिली उचल ३१०० रुपये देऊन एफआरपी प्रमाणे १४ दिवसांत पेमेंट देण्यात यावे, वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे कट केलेले कनेक्‍शन पुन्हा जोडण्यात यावे, तशा सूचना महावितरण कंपनीला करावी, स्वामिनाथन आयोग लागू करून संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्‍ती करण्यात यावी, अशी मागणी विभागीय आयुक्‍तालयाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. कपाशीच्या किडलेल्या बोंडासह कपाशीची झाडे हाती घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यासंदर्भात घोषणाबाजी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT