ठिय्या आंदोलन
ठिय्या आंदोलन 
मुख्य बातम्या

सर्वपक्षीय ‘बंद’ला वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

अकोला  ः देश आणि राज्यात इंधनाच्या वाढलेल्या किमती पाहता शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी (ता. १०) काँग्रेस व समविचारी पक्ष, संघटनांनी ‘बंद’ची हाक दिली होती. या ‘बंद’ला वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये संमिश्र स्वरूपात यश मिळाले. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. दुपारपासून व्यवहार, वाहतूक पूर्वपदावर यायला सुरवात झाली. बाजार समित्यांमधील अावकेवर काहीसा परिणाम झालेला दिसून अाला.

देशात व त्यातही राज्यात प्रामुख्याने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत अाहे. या वाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले अाहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने भारत बंद पुकारला होता. या अावाहनाला राज्यातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी अादी पक्षांनी पाठिंबा दिला.

विरोधकांच्या सर्वपक्षीय बंदच्या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. एसटी महामंडळाच्या बसेस, तसेच इतर प्रवाशी वाहतूक सुरळीत होती. अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंप दुपारी १२ वाजेपर्यंत कडकडीत बंद होते. याबाबत पेट्रोल- डिझेल डीलर, विक्रेते असोसिएशनने निर्णय घेतला होता.

बाजार समित्यांमध्ये अावक मंदावलेली भारत बंदमुळे बाजार समित्यांमधील व्यवहारांवर थोडाफार परिणाम झालेला  दिसून अाला. मुळातच गेल्या १५ दिवसांपासून बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. मागील अाठवड्यात त्यांचे व्यवहार सुरू झाले. त्यानंतर सोमवारी  अाठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा बंद अाल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाची अावक कमी केली. अकोला, खामगाव, मलकापूर, वाशीम, मालेगाव, कारंजा, अकोट अशा सर्वच महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये या ‘बंद’चा परिणाम दिसून अाला. अद्याप मूग वगळता इतर शेतीमालाचा हंगाम नसल्याने बाजार समित्यांमधील व्यवहारही तसे जेमतेम अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT