onion
onion  
मुख्य बातम्या

कांदा लिलावातील अमावास्येचे ‘ग्रहण’ अखेर ७५ वर्षांनंतर सुटले 

टीम अॅग्रोवन

नाशिक : कांदा पिकाच्या अनुषंगाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र बाजार समिती अस्तित्वात आल्याच्या ७५ वर्षांपासून अमावास्येला मुख्य आवारात कांदा व धान्य लिलाव बंद ठेवले जायचे. तर विंचूर उपबाजार येथे आवारात कामकाज सुरू होते. याबाबत बाजार समितीला उशिरा का होईना कामकाज सुरू करण्याबाबत शहाणपण आले आहे. आता बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा याबाबत बदल करून अमावास्येच्या दिवशीही कांद्याचे लिलाव सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय बाजार समिती व्यवस्थापन, प्रशासन व मर्चन्ट्‌स असोसिएशनने मंगळवारी (ता. ८) संयुक्त बैठकीत घेतला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सूचनेप्रमाणे बाजार समितीतील कांदा लिलाव २४ दिवस बंद होते. त्यात खरीप हंगाम तोंडावर असल्याने बाजार समिती कामकाज सुरू राहावे, अशी शेतकऱ्यांचीही मागणी होती. बाजार समितीने या मागणीचा विचार करून लासलगाव मर्चन्ट्‍स असोसिएशनच्या सभासदांसोबत चर्चा केली. त्यामध्ये अमावास्येच्या दिवशी कामकाज सुरू करण्याचे निश्‍चित करत अनेक दिवसांची परंपरा मोडीत काढली आहे. येत्या अमावास्येपासून सकाळच्या सत्रात व प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.  कारण होते अस्पष्टच  लासलगाव बाजार समितीची स्थापना झाल्यापासून तर आजअखेर गेल्या ७५ वर्षांपासून अमावास्येला कांदा व धान्य लिलाव होत नव्हते. अमावस्येला लिलाव का बंद राहतात याबाबत स्पष्ट कारण दिले जात नव्हते. आता या कुप्रथेला फाटा देत दर अमावास्येला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव आता होणार आहेत.  प्रतिक्रिया एक दिवस कामकाज बंद राहिले तर ४ कोटींचे व्यवहार ठप्प होतात. अमावास्येला कामकाज बंद राहिल्यास शेतकऱ्यांचीही गैरसोय होते. ही बाब विचारात घेता चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. अलीकडे उलाढाल वाढली आहे. त्यामुळे व्यापारी व बाजार समितीचे नुकसान टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीस आणावा.  - सुवर्णा जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT