Adasali sugarcane floods hit in Sangli
Adasali sugarcane floods hit in Sangli 
मुख्य बातम्या

सांगलीत आडसाली उसाला महापुराचा फटका

टीम अॅग्रोवन

सांगली : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराचा फटका आडसाली ऊस लागवडीला बसला आहे. परिणामी, गेल्या वर्षीपेक्षा चालूवर्षी १३ हजार १९३ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या गाळपावर परिणाम होण्याची शक्यता साखर कारखानदारांनी व्यक्त केली.

गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात आडसाली उसाचे क्षेत्र ३२ हजार ३२३ हेक्टर होते. वास्तविक पाहता आडसाली उसाचे एकरी उत्पादनही चांगले मिळते. त्यामुळे या हंगामातील ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदाही शेतकऱ्यांनी शेती मशागत करून ऊस लागवडीसाठी शेती तयार केली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लागणीस प्रारंभ केला. 

मात्र, यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत अतिवृष्टी झाली. त्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठची शेती पाण्याखाली होती. अनेक ठिकाणी शेतात १५ ते २० दिवस पाणी साचून होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आडसाली उसाची लागवड करता आली नाही.

यंदा जिल्ह्यात १८ हजार ४१० हेक्टरवर या हंगामातील उसाची लागवड झाली आहे. पूर्व हंगामातील उसाची लागवडीवेळी परतीचा पाऊस झाला. त्यामुळे या हंगामातील उसाचे क्षेत्रात सुमारे ७० टक्के घट झाली आहे. वास्तविक पाहता आडसाली आणि पूर्व हंगामातील लागवडीचे क्षेत्र घटल्याने पुढील वर्षी गाळपासाठी उसाची कमतरता पडण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT