सोलापूर जिल्ह्यात सात चारा छावण्यांवर होणार कारवाई
सोलापूर जिल्ह्यात सात चारा छावण्यांवर होणार कारवाई 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात सात चारा छावण्यांवर होणार कारवाई

टीम अॅग्रोवन

सोलापूर : मोहोळ तालुक्‍यातील चार, करमाळा तालुक्यांतील एक आणि माढा तालुक्‍यातील दोन छावण्यांनी केलेल्या बोगसपणामुळे जिल्हा प्रशासनाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. त्यावर छावणीचालक संस्थांनी दिलेला खुलासा पुरवठा विभागाने अमान्य केला आहे. या छावणीचालकांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत. 

मोहोळ तालुक्‍यातील वडवळ, वडदेगाव, पाटकूल आणि शिरापूर, माढा तालुक्‍यांतील तुळशी येथील दोन आणि करमाळा तालुक्‍यांतील वीट येथील स्व. कांतिलाल आवटे संस्थेच्या छावणीमध्ये गैरप्रकार आढळला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या पथकाने पाहणी केली होती. 

छावणीचालकांनी जनावरांची दाखविलेली संख्या व पथकाला प्रत्यक्ष पाहणीत आढळलेली जनावरांची संख्या यामध्ये तफावत आढळली. त्यानंतर या छावणीचालकांना नोटीस बजाविण्यात आली. जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे उगवलेल्या गवताने छावण्यांमधील जनावरांची संख्या कमी होऊ लागली आहे. कारवाईच्या भीतीनेही छावण्यांमधील जनावरांच्या संख्येत घट होत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील छावण्या ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. जिल्ह्यातील त्या त्या भागातील चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन छावणी बंद करण्याचे अथवा सुरू ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT