Acquire seed production skills: Sawant, Deputy Superintendent of Police
Acquire seed production skills: Sawant, Deputy Superintendent of Police  
मुख्य बातम्या

बीजोत्पादनाचे कौशल्य करा आत्मसात : पोलिस उपअधीक्षक सावंत

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘‘युवकांनी बीजोत्पादन व दूध उत्पादनाचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. मनापासून इच्छा असेल तर यश तुमचेच आहे. आपण फक्त सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे’’, असे मत सोलापूरचे पोलिस उपअधीक्षक अरुण सावंत यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे आयोजिलेल्या व २५ दिवस चालणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे उपस्थित होते.

बेंदगुडे यांनी शेतकऱ्यांना गटाने बीजोत्पादनात उतरण्याचे आवाहन केले. त्यासाठी शासन त्यांना प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दूध उत्पादनाच्या विषयावरील प्रशिक्षणाची माहिती या विषयाचे तज्ज्ञ व प्रशिक्षक डॉ. प्रकाश कदम यांनी दिली.

बीजोत्पादनाची माहिती या विषयाचे तज्ज्ञ व प्रशिक्षक अमोल शास्त्री यांनी दिली. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ला. रा. तांबडे यांनी कौशल्याचे महत्त्व कसे आहे, हे उदाहरण देऊन सांगितले.

कौशल्य अंगी असेल तर तुम्हीही व्यावसायिक कंपन्यांप्रमाणे स्वतःचे उत्पादन घेऊ शकता. कृषी विज्ञान केंद्र आपल्याला प्रशिक्षणानंतरही मार्गदर्शन करेल, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT