milk collection
milk collection  
मुख्य बातम्या

मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा बंद करू

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही दूध उत्पादक मोठ्या अडचणीत सापडलो आहोत. त्यामुळे आमच्या मागण्यांबाबत येत्या ३१ जुलैपर्यंत सकारात्मक सकारात्मक विचार करावा, अन्यथा दूध धंदा परवडत नसल्यामुळे आम्ही दूधपुरवठा बंद करू, असे निवेदन शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. चार महिन्यांपासून कोरोना संकटामुळे दुधाला अत्यल्प दर मिळतो आहे. केवळ १५ ते २३ रुपये प्रति लीटर मिळणाऱ्या या दरामुळे दूध उत्पादकांचा होणारा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. संकटात सापडलेल्या या दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी चार प्रमुख मागण्या शेतकरी नेते धोर्डे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या आहेत. या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.    या आहेत मागण्या

  • म्हशीच्या दुधाला प्रति लीटर ६० रुपये व गाईच्या दुधाला प्रतिलीटर ३५ रुपये दर मिळावा
  • दूध संकलन केंद्रामध्ये असलेले दूध तपासणी यंत्र पारदर्शी असावे (फॅट डिग्री व एसएनएफ)
  • दुधाचे थकलेले पेमेंट त्वरित मिळावे व पुढील पेमेंट नियमित देणे बंधनकारक असावे.
  • पशु खाद्य जनावरांची औषधे व पशुवैद्यकीय सेवा जनावरांचे लसीकरण कमी दरात व तत्काळ मिळावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT