Accelerate wheat threshing in Khandesh
Accelerate wheat threshing in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात गहू मळणीला वेग

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात गहू मळणीला वेग आला आहे. या महिन्यात ती सर्वत्र पूर्ण होईल. मळणीसाठी शेतकरी मोठ्या हार्वेस्टरला पसंती देत आहेत. 

हार्वेस्टरच्या उद्योगात खानदेशातील काही उद्योजकही सहभागी झाले आहेत. पंजाब, हरियाना भागातूनही हार्वेस्टरचालक खानदेशात गहू मळणीसाठी दाखल झाले आहेत. मोठ्या हार्वेस्टरमुळे गहू कापणी, गोळा करणे व नंतर लहान हार्वेस्टरचे मळणी, असा वेळ व खर्च वाचत आहे. शिवाय, पैसेही कमी लागत आहेत. एकरी १५०० ते १६०० रुपये दर हार्वेस्टरचालक गहू मळणीसाठी घेत आहेत. एका तासात तीन ते चार एकरातील गव्हाची मळणी व्यवस्थितपणे हार्वेस्टरच्या मदतीने करता येत आहे. 

सध्या मजूर उपलब्ध होत नाहीत. मजुरांकरवी गहू कापणी, गोळा करणे व नंतर मळणी यासाठी मजूरही वेळेत उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यात मोठ्या हार्वेस्टरच्या तुलनेत अधिकचा खर्चही येत आहे. एकरी अडीच हजार ते २८०० रुपये खर्च मजुरांकरवी गहू कापणी, गोळा करणे यासाठी लागत आहे. ट्रॅक्टरचलित यंत्रणेद्वारे गहू मळणीसाठी प्रतिक्विंटल २५०  रुपये खर्च लागत आहे. यामुळे पंजाब, हरियाना भागातील हार्वेस्टरने गहू मळणीचे अधिक काम खानदेशात मिळत आहे. 

ही मंडळी विविध भागातील अग्रभागी असलेल्या पेट्रोल पंप, ढाबे, शेतांमध्ये मुक्कामी राहत आहे. मुख्य रस्त्यानजीक त्यांचे वास्तव्य असते. शेतकऱ्यांशी सहज संपर्क व्हावा, यासाठी ही मंडळी मुख्य रस्त्यांनजीकच्या पेट्रोल पंपांसह शेतांमध्ये आपले वास्तव्य करीत आहे. यातच गेले चार दिवस खानदेशात ढगाळ वातावरण आहे. 

पेरणी सुमारे ३१ हजार हेक्टरवर 

खानदेशात गव्हाची पेरणी सुमारे ३१ हजार हेक्टरवर झाली होती. सर्वाधिक सुमारे १८ हजार हेक्टरवर पेरणी जळगाव जिल्ह्यात झाली होती. यातील ८० टक्के गव्हाची मळणी पूर्ण झाली आहे. सध्या फक्त उशिरा पेरणीच्या व देशी वाणांच्या गव्हाची मळणी पूर्ण झालेली नाही. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गव्हाची मळणी १०० टक्के पूर्ण होईल, असे चित्र खानदेशात सध्या आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT