कृषी औजारे
कृषी औजारे 
मुख्य बातम्या

राज्यात सव्वा लाख शेतकरी अवजारांच्या प्रतीक्षेत

हेमंत पवार

कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांपुढील शेतमजुरांची समस्या कमी करून त्यांना मशागत आणि पीक काढणीसाठी उपयोगी पडणारी छोटी अवजारे देण्याचा निर्णय शासनाच्या कृषी विभागाने घेतलेला आहे. कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत १ लाख २५ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यापैकी केवळ एक हजार ४१ शेतकऱ्यांनाच सप्टेंबरपर्यंत अवजारांसाठीचे अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित १ लाख २२ हजारांवर शेतकरी अजूनही अवजारांसाठी ‘वेटिंग’वर आहेत.   शेती कामासाठी मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे. दिवसाकाठी ४०० ते ५०० रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यावर पर्याय म्हणून शासनाच्या कृषी विभागाने शेती कामे वेळेत आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पूर्ण व्हावीत यासाठी त्यांना अनुदानावर अवजारे उपलब्ध करून देण्याचे धोरण घेतले. त्यानुसार शासनाच्या उन्नत शेती, समृध्द शेतकरी अभियानातून छोटे ट्रॅक्‍टर, पॉवरटीलर, रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, भातपेरणीसाठी ट्रान्सप्लांटर, रिपर, उसासाठी पाचट कुट्टी यंत्र, फळबागेसाठी स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर यासह अन्य अवजारे खरेदीसाठी अनुदान देण्यात येते.  शेतकऱ्यांना अवजारे त्यांच्या पसंतीने घेण्याची सवलत कृषी विभागाने दिली आहे. शासनाकडून कृषी यांत्रिकीरणासाठी १९८.७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी विस्तारित कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमासाठी ६१.७४ कोटी रुपयांची तरतूद होती. कृषी यांत्रिकरणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातून एक लाख २३ हजार २७२ अर्ज कृषी विभागाकडे जमा झाले. त्यातील ३९ हजार ३८० निवडपात्र शेतकऱ्यांना कळवण्यात आले. त्यापैकी एक हजार ४१ शेतकऱ्यांना आठ कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान सप्टेंबपर्यंत देण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहे. उर्वरित एक लाख २२ हजारांवर शेतकरी अजूनही ‘वेटिंग’वरच आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT