विनायकराव पाटील, विलास शिंदे
विनायकराव पाटील, विलास शिंदे 
मुख्य बातम्या

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव पाटील यांना जाहीर

टीम अॅग्रोवन

सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा लाभलेले नाशिक येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, वनाधिपती विनायकदादा पाटील यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार'' जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जलसंधारण व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून राज्यातील युवा शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवणारे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना तिसरा ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार'' जाहीर करण्यात आला.

२ सप्टेंबर रोजी आबासाहेब वीर यांच्या ११३ व्या जयंतीदिनी गोकुळ अष्टमीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.

या वेळी श्री. भोसले म्हणाले, की कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या एकवीस वर्षांपासून ‘‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’’ प्रदान करण्यात येतो. 

पुरस्काराचे यंदाचे २२ वर्ष आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सहकार, शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करून समाजहित साधणाऱ्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेल्ल्या व्यक्तींना कारखान्यांच्या वतीने प्रतिवर्षी आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

Tur Market : तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

SCROLL FOR NEXT