सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीची ९३ टक्के पेरणी
सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीची ९३ टक्के पेरणी 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीची ९३ टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन

सोलापूर  : जिल्ह्यात यंदा पावसाने परंपरेप्रमाणे उशिरा सुरवात केली. पण, उशिराच्या पावसामुळे रब्बी हंगाम काहीसा लांबला. तरीही रब्बी ज्वारीची पेरणी आश्‍वासकरीत्या झाली. जवळपास ९३ टक्क्यांपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. काही ठरावीक तालुके वगळता सरसकट सगळीकडे सध्या पेरणी सुरू आहे. त्यात सर्वाधिक ज्वारीला पसंती दिली जाते आहे. त्यामुळे उशिरा का होईना हा हंगाम साधला जाईल, असे चित्र आहे. 

गेल्या वर्षीचा दुष्काळ, यंदा जून ते सप्टेंबरमध्ये पावसाने मारलेली दडी, अशी भीषण स्थिती आहे. सप्टेंबरअखेर व ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात रब्बी ज्वारीची पेरणी ९३ टक्के झाली आहे. परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जिल्ह्यातील रब्बी ज्वारीचा पेरणीचा टक्का समाधानकारक झाला आहे. पावसाअभावी खरीप वाया गेल्याने आता परतीच्या पावसामुळे रब्बीचे पीक हाती येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. 

या वर्षी राज्यात सर्वांत कमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. सप्टेंबरअखेर व ऑक्‍टोबर महिन्यांतील पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या चित्रा नक्षत्रातील पावसाने शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. यंदा स्वाती नक्षत्राला २४ ऑक्‍टोबरपासून प्रारंभ होत असून, या नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यास यंदाही जिल्ह्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. 

या वर्षी सोलापूर जिल्ह्यात पाच लाख ८८ हजार हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. अन्य पिकांमध्ये गहू, हरभरा असतो, पण त्याचे क्षेत्र अगदीच कमी आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाने ओढ दिल्याने या वर्षी उसाची लागवड घटली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करत ज्वारी पेरणीवर अधिक भर दिल्याचे दिसत आहे. 

तालुकानिहाय ज्वारी पेरणीचे सरासरी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

उत्तर सोलापूर : ६४९, दक्षिण सोलापूर : ६२८, बार्शी : ५२१, अक्कलकोट : ६८९, मोहोळ : ५१९, माढा : ७५१, करमाळा : ९८९, पंढरपूर : ५७, सांगोला : २९५, माळशिरस : २७३, मंगळवेढा : ५११. एकूण पाच लाख ८८ हजार हेक्‍टर. या पैकी ९३ टक्के हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT