भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनासाठीचे अर्ज रद्द 895 farmers in Bhandara Application for micro irrigation canceled
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनासाठीचे अर्ज रद्द 895 farmers in Bhandara Application for micro irrigation canceled 
मुख्य बातम्या

भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनासाठीचे अर्ज रद्द

टीम अॅग्रोवन

भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. १ हजार ४०३ शेतकऱ्यांकडून योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यात आले. मात्र विविध कारणांमुळे यातील ८९५ शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले असून, ४२४ शेतकऱ्यांनाच अनुदान मिळाले आहे. 

धानाचे कोठार, अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात भाजीपाल्या खालील क्षेत्रातही नजीकच्या काळात वाढ नोंदविण्यात आली आहे. उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्यासाठी सरसावलेल्या शेतकऱ्यांची सूक्ष्म सिंचनाला वाढती पसंती आहे. मात्र अनुदानासाठीच्या प्रस्तावात किरकोळ त्रुटी दाखवीत अर्ज बाद होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात १ हजार ४०३ शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन अनुदान योजनेसाठी अर्ज केले. त्यापैकी ८९५ अर्ज रद्द ठरविण्यात आले. 

अवघ्या ४२४ शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, १८१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्यांनी संच खरेदी केले नाहीत परिणामी त्यांचे अनुदान प्रस्ताव रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली आहे.

असे मिळते अनुदान ठिबक आणि तुषार सिंचनासाठी शासनाकडून अल्प, अत्यल्प भूधारकांना ५५ टक्‍के तर पाच एकरपेक्षा अधिक शेती असणाऱ्यांना ४५ टक्‍के अनुदान दिले जाते. ठिबकसाठी एकरी ५० ते ६० हजार खर्च होऊन ३२ हजार तर तुषार सिंचनासाठी २० हजार रुपयांचा खर्च आणि अवघे ८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. 

अशी आहे स्थिती       एकूण प्रस्ताव    १४०३  अनुदान मंजूर    ४२४  प्रलंबीत शेतकरी    १८१  रद्द अर्ज    ८९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT