द्राक्ष
द्राक्ष 
मुख्य बातम्या

राज्यातून ८८ हजार ८९० टन द्राक्षे युरोपात निर्यात

ज्ञानेश उगले

नाशिक : राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून १५ एप्रिल पर्यंत आटोपण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत गतसप्ताहाच्या अखेरपर्यंत राज्यातून एकूण ६७४३ कंटेनर मधून ८८, ८९० टन द्राक्षे युरोपीय देशांत निर्यात झाली. येत्या सप्ताहात ही निर्यात ७ हजार कंटेनरचा आकडा पार करेल अशी चिन्हे आहेत.  एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात द्राक्षांचा तुटवडा जाणवत असतांना देशांतर्गत व जागतिक बाजारातून मागणी वाढली. देशांतर्गत बाजारात प्रतिकिलोला ३५ ते ५५ व सरासरी ४५ रुपये दर मिळाला. निर्यातक्षम द्राक्षांना या वेळी किलोला ५० ते ८० व सरासरी ६५ रुपये दर मिळाले. नाशिक, नगर व सांगली जिल्ह्यातील काही मोजक्‍याच बागा शिल्लक आहेत. राज्यातील बहुतांश भागात द्राक्ष हंगाम आटोपला आहे. या हंगामात देशांतर्गत, तसेच निर्यातीच्या बाजारातील आवक व दर स्थिर राहीले. बहुतांश भागात उत्पादन कमी निघाल्याने त्याचा फटकाही बसला आहे. भारतातील महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातून प्रामुख्याने निर्यात होते. महाराष्ट्रातून ८८,८९० टन तर कर्नाटकमधून अवघी ९२ टन द्राक्ष निर्यात युरोपात झाली. युरोपातील नेदरलँड, जर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क, फिनलंड, बेल्जियम, नॉर्वे, लॅटविया, फ्रान्स, लिथुअानिया, इटली, स्वित्झर्लंड, स्पेन, आयर्लंड, स्वीडन, ऑस्ट्रीया, झेक गणराज्य, ग्रीस या देशात निर्यात झाली.   जिल्हानिहाय द्राक्ष निर्यात (टनांमध्ये)

जिल्हा     द्राक्ष निर्यात
नाशिक ७७,५४२
सांगली ५,७८६
सातारा २,७२९
लातूर ६२३
पुणे ५७८
उस्मानाबाद ५०८
नगर ४९९
सोलापूर ७०
बीड २६
एकूण ८८,८९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT