78 water samples from 60 villages in the city contaminated
78 water samples from 60 villages in the city contaminated 
मुख्य बातम्या

नगरमधील ६० गावांतील ७८ पाणी नमुने दूषित

टीम अॅग्रोवन

नगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सप्टेंबर महिन्यात पाण्याचे १३२१ नमुने तपासण्यात आले. त्यात ६० गावांतील ७८ नमुने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे दुषित पाण्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमुने तपासले जातात. ज्या गावातील पाणी दूषित आढळल्यास त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे. एप्रिल महिन्यात तपासण्यात आलेल्या १३२१ पाणी नमुन्यांपैकी ७८ नमुने दूषित आढळले.

या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी ५.९० टक्के गेली आहे. यामध्ये सर्वाधिक पाण्याचे नमुने पारनेर तालुक्‍यातील नऊ गावांतील १६ निघालेले आहेत. त्याखालोखाल संगमनेर तालुक्‍यातील सात गावातील दहा पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात कर्जत व जामखेड विधान सभा मतदार संघातील दोन्ही तालुक्‍यातील ५७ पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात एकही नमुना दूषित आढळून आलेला नाही.

तालुकानिहाय तपासलेले नमुने, कंसात दूषित नमुने नगर ः ९७ (आठ), अकोले ः १२३ (सात), कोरगाव ः ९१ (चार), नेवासे ः १११ (एक), पारनेर ः १११ (१६), पाथर्डी ः १३८ (पाच), शेवगाव ः ७८ (तीन), राहाता ः ६५ (तीन), राहुरी ः ८५ (पाच), संगमनेर ः १३७ (दहा), श्रीगोंदे ः १४४ (नऊ), श्रीरामपूर ः ८४ (सात). जामखेड ः २९ (शून्य), कर्जत ः २८ (शून्य).

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे नगर ः बुऱ्हानगर, हमीदपूर, वारुळवाडी, अकोळनेर, सारोळा, सोनेवाडी, घोसपुरी. अकोले ः आंबड, केळी ओतूर, करंडी, ब्राम्हणवाडा. कोपरगाव ः डाऊच खुर्द, आंचलगाव, वेससोयगाव, काकडी. नेवासे ः गोणेगाव. पारनेर ः काकणेवाडी, चौंभुत, राळेगण, म्हसे, गोरेगाव, रायतळे, हिवरेकोदडा, जामगाव. पाथर्डी ः जिरेवाडी, जवखेडे खालसा, कारेगाव, औरंगपूर, घाटशिरस. शेवगाव ः भायगाव, देवटाकळी. राहाता ः रांजनखोल, ममदापूर, लोणी बुद्रुक. राहुरी ः गुजाळे, कात्रड, निंभेरे, सोनगाव, चिखलठाण. संगमनेर ः निमगाव खलू, नांदुरी दुमाला, संगमनेर खुर्द, वाघापूर, सुकेवाडी, मंगळापूर, कोल्हेवाडी, श्रीगोंदे ः देवदैठण, सारोळा सोमवंशी, घारगाव, घोटवी, वडाळी, चिखली, कारेगाव, निंबवी. श्रीरामपूर ः टाकळीभान, दिघी, गोंडेगाव, शिरगाव, उंदिरगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT