कृषी औजारे
कृषी औजारे  
मुख्य बातम्या

अवजार खरेदीपोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ७५ कोटी जमा

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) धोरणाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ११ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ७५ कोटी रुपयांचे अनुदान जमा झाले आहे.  शेती अवजारे अनुदान वाटपात महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) व काही ठेकेदारांकडून गैरव्यवहार केला जात होता. घोटाळेबहाद्दरांना वठणीवर आणण्यासाठीच ‘डीबीटी’ धोरणाचे निकष अवजार अनुदानासाठी यंदा लावण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून ४ कोटी ९८ लाख रुपये, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलबिया विकास योजनेतून २ कोटी ५३ लाख, कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून २३ कोटी ९५ लाख आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ४२ कोटी ७८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ‘डीबीटी’ने जमा करण्यात आले आहेत.  ‘डीबीटी’मुळे शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम इतरत्र जाण्याचा किंवा ठेकेदाराला परस्पर रकमा जाण्याचा भाग बंद झाला आहे. एका शेतकऱ्याला कोणत्याही एकाच अवजारासाठी अनुदान दिले जात आहे. शेती अवजारांसाठी यंदा डीबीटीतून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना २४ कोटी ३७ लाख रुपये तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना १९ कोटी ७७ लाख रुपये वाटण्याची तयारी कृषी खात्याने केली आहे. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना यंदा अवजारांपोटी १५३ कोटी रुपये वाटण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा एकूण १९८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे.  सरकारी अनुदानातून अवजारे खरेदी करण्यासाठी राज्यातून यंदा एक लाख २० हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मागासवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य असूनही अनुदानासाठी कमी अर्ज आलेले आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या ९२०७ शेतकऱ्यांनी तर अनुसूचित जमातीच्या ५८१४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. ट्रॅक्टर खरेदीसाठी सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. पॉवरटिलरसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत, रोटाव्हेटसाठी ६३ हजार रुपयांपर्यंत तर भात लागवड यंत्रासाठी दोन लाखांपर्यंत अनुदान दिले जात आहे. 

‘डीबीटी’ तत्त्वावरील अनुदान वाटपांची वैशिष्ट्ये

  • राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १९८ कोटी रुपये जमा करण्याचे यंदा नियोजन. 
  • ‘डीबीटी’ तत्त्वानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी १३१ कोटी रुपये कृषी खात्याच्या ताब्यात.
  • कृषी खात्याच्या ताब्यात असलेल्या निधींपैकी ११ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक     खात्यात ७५ कोटी २६ लाख रुपये जमा. 
  • आतापर्यंत अनुदानासाठी अर्ज केलेल्या १ लाख २० हजार शेतकऱ्यांपैकी ३० हजार शेतकऱ्यांना अनुदान मंजुरीचे पूर्वसंमतीपत्र दिले गेले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT