74 power connections in Visapur Broke; The farmers got angry
74 power connections in Visapur Broke; The farmers got angry 
मुख्य बातम्या

विसापुरात ७४ वीजजोड तोडले; शेतकरी संतापले

टीम अॅग्रोवन

विसापूर, जि. सांगली :  येथील ७४ शेतकऱ्यांचे वीजजोड थकबाकीमुळे महावितरणने तोडले. ऐन हंगामातच शेतीचा वीजपुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पूर्वसूचना न देताच पाच डीपीखालील वीजजोड बंद केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, नोटिसा दिल्याचे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.

कृषिपंपांच्या वीजबिलांची थकबाकी लाखो रुपयांत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे वीस हजार रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. महावितरणने वारंवार नोटीस दिल्या. तोंडी कल्पना दिली. तरीसुद्धा शेतकरी बिल भरण्यास तयार नाहीत. गेल्या महिन्यात एका डीपीचे जोड तोडले. या भागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आठ दिवसांत पैसे जमा करतो, असे सांगितले. वीजजोड जोडले. मात्र महिना उलटला तरी थकबाकी तशीच आहे. अखेर महावितरणने थेट डीपीतील वीजजोड तोडण्याचा धडाका सुरू केला.

जिरवळ मळा व मोरे मळा येथील पाच डीपीतील तब्बल ७४ वीजजोड तोडली. या भागात ऊस, द्राक्ष बागाची मोठ्या प्रमाणात शेती आहे. सध्या द्राक्ष बागांचा बहर सुरू आहे. उसालाही अखेरचे पाणी देण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र अचानक वीज तोडल्याने शेतकऱ्यांची धावाधाव झाली.

वास्तविक महावितरणने अगोदर माहिती दिली असती तर काही रक्कम जमा करता आली असती, असे काहींनी सांगितले. कनेक्शन तोडल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील यांना शेतकऱ्यांनी दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT