63,000 hectares hit in Kolhapur
63,000 hectares hit in Kolhapur 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे ६३ हजार ४२० हेक्टरमधील खरीप पिके व फळ पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे यंदाच्या खरिपाला जबरदस्त धक्का बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसानीत वाढच होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे पिके वाहत जाणे व अति पाण्यामुळे ती कुजण्याचा धोका उत्पन्न झाला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक फटका चंदगड तालुक्यातील १४१ गावांना बसला असून, या तालुक्यातील २१६५ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिके बाधित होण्याचा अंदाज आहे. या खालोखाल पन्हाळ्यात १२४, राधानगरीत १२२ भुदरगडमध्ये ११४ गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. करवीर तालुक्यातील १०२ गावांत विविध पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकामध्ये ऊस, भात सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला व फळपिकांचा समावेश आहे. 

कृषी विभागाने जाहीर केलेल्या नजर अंदाजामध्ये सर्वाधिक नुकसान शिरोळ तालुक्यात होण्याचा अंदाज आहे. या तालुक्यात २० हजार २६० हेक्‍टरवरील विविध पिके पुराच्या पाण्यात खराब होण्याची शक्यता आहे. हातकणंगले व करवीर तालुक्यात सात हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र पुराने बाधित होण्याची शक्यता आहे. विशेष करून वाढीच्या अवस्थेत असलेली पिके महापुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाली आहेत. अद्याप महापूर कायम असल्याने पिकांच्या नुकसानीचा नेमका तपशील स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली. 

जिल्ह्यात या वर्षी एकाचवेळी अतिवृष्टी व महापूर या दोन्ही संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे पेरणी केलेली बहुतांशी पिके एकतर अतिवृष्टीने किंवा महापुराने खराब होण्याचा धोका असल्याने यंदाच्या खरीप हंगामात उत्पादन घटीचा धोका शेतकऱ्याकडे उभा ठाकला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने दडी दिल्याने पेरण्या रखडल्या, परंतु नंतरच्या काळामध्ये पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी गडबडीने पेरण्या केल्या. परंतु महापुरामुळे पेरणी केलेल्या पिकांचे भवितव्य अंधकारमय बनले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT