53 Sugar Factories in the list of 'Tagging' Reduction Initiatives
53 Sugar Factories in the list of 'Tagging' Reduction Initiatives 
मुख्य बातम्या

‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर कारखाने

टीम अॅग्रोवन

पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने यंदा लागू केलेल्या ‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. ‘टॅगिंग’ संमतीसाठी या कारखान्यांच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालकांकडून हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. 

शासकीय भागभांडवल, शासकीय कर्जे आणि हमीशुल्कापोटी या कारखान्यांकडे थकीत असलेली देणी वसूल करण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अंकन (टॅगिग) नियमावलीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे या साखर कारखान्यांना कर्ज देणाऱ्या बॅंका आता त्यांच्या कर्जाची वसुली करताना सरकारी थकीत देणीच्या रकमादेखील कापून घेणार आहेत. साखर विक्री करताना कारखान्यांना मिळणाऱ्या रकमेतून ही कपात होईल. 

‘‘टॅगिंगचे नियोजन करताना संबंधित कारखान्यांनी वाटलेले रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) पाहून साखर आयुक्तालयाने दोन याद्या तयार केल्या आहेत. 

३१ ऑगस्ट २०२१ अखेर पूर्ण एफआरपी देणारे कारखाने ‘अ’ यादीत असतील. त्यांना साखरेच्या प्रतिक्विंटलवर ५० रुपये टॅगिंग असेल, तर ३१ ऑगस्टअखेर पूर्ण एफआरपी न दिलेले कारखाने ‘ब’ यादीत असून, त्यांना २५ रुपये टॅगिंग द्यावे लागेल. टॅगिंग आदेशाची अंमलबजावणी संबंधित बॅंका करणार आहेत. या प्रक्रियेवर प्रादेशिक सहसंचालक लक्ष ठेवतील,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

५० रुपये टॅगिंग कपात असलेले कारखाने कोल्हापूर ः कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना (ससाका), सदाशिवराव मंडलीक ससाका, दौलत ससाका (भाडेतत्त्वावर सध्या अथर्व इंटर ट्रेडकडे). सांगली ः सर्वोदय ससाका, राजे विजयसिंह डफळे- राजारामबापू पाटील युनिट ४, वसंतदादा ससाका (भाडेतत्त्वावर सध्या दत्त इंडियाकडे), विश्‍वासराव नाईक ससाका, मोहनराव शिंदे ससाका. सातारा ः रयत ससाका (भाडेतत्त्वावर सध्या अथनी शुगरकडे), श्रीराम ससाका (भाडेतत्त्वावर सध्या जवाहर शेतकी ससाकाकडे). पुणे ः कर्मयोगी शंकरराव पाटील ससाका, संत तुकाराम ससाका, राजगड ससाका. उस्मानाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर ससाका, शिवशक्ती शेतकी ससाका. नगर ः अगस्ती ससाका, वृद्धेश्‍वर ससाका, केदारेश्‍वर ससाका, भाऊसाहेब थोरात ससाका, साईकृपा. नाशिक ः वसंतदादा वसाका. औरंगाबाद ः शरद ससाका, संत एकनाथ ससाका. जालना ः सागर ससाका, रामेश्‍वर ससाका. बीड ः सुंदरराव सोळंके ससाका, छत्रपती ससाका, जयभवानी ससाका, अंबाजोगाई ससाका. हिंगोली ः पूर्णा ससाका, टोकाई ससाका. लातूर ः रेणा ससाका.

२५ रुपये टॅगिंग कपात असलेले कारखाने कोल्हापूर ः अजरा ससाका, अप्पासाहेब नलावडे ससाका. पुणे ः छत्रपती ससाका. सातारा ः किसनवीर ससाका. सोलापूर ः संत दामाजी ससाका, विठ्ठल ससाका, मकाई ससाका, संत कुर्मदास ससाका, भीमा ससाका, वसंतराव काळे ससाका, सांगोला तालुका ससाका. नंदूरबार ः सातपुडा ससाका, आदिवासी ससाका. बीड ः वैद्यनाथ ससाका. हिंगोली ः मराठवाडा कळमनुरी ससाका. नांदेड ः शंकर ससाका.

एफआरपीनुसार दोन याद्या राज्यात साखर कारखान्यांनी सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचे भांडवल तसेच हमी प्राप्त केली आहे. मात्र ती देणी वर्षानुवर्षे थकीत ठेवण्यात आल्याने आता २०२१-२२ च्या गाळप हंगामात साखर विक्री करताना ‘टॅगिंग’ उपक्रम राबवून या थकीत रकमा वसूल केल्या जातील.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT