51% useful water in large projects in Marathwada
51% useful water in large projects in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१ टक्के उपयुक्त पाणी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा जुलैअखेर ४४ टक्क्यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ५१ टक्क्यांवर आला आहे. मांजरा व सीनाकोळेगाव या दोन मोठ्या प्रकल्पांत अजूनही उपयुक्त पाणी नसल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण दमदार ते जोरदार स्वरूपाचे आहे. त्याचा परिणाम म्हणून विविध प्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होते आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ५१ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ४० टक्के, ७४९ लघु प्रकल्‍पांत २३ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत ५७ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांत १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. 

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी जायकवाडीमध्ये ४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. येलदरी ७८ टक्के, सिद्धेश्वर ६० टक्के, माजलगाव ५७ टक्के, निम्न मनार ६५ टक्के, विष्णुपुरी ८३ टक्के, निम्नदुधना ३३ टक्के, तर सर्वात कमी निम्न तेरणा प्रकल्पात केवळ १ टक्के उपयुक्त पाणी आहे. 

उस्मानाबादमधील ८ मध्यम प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली

७५ मध्यम प्रकल्पांपैकी बीड व लातूरमधील प्रत्येकी २, उस्मानाबादमधील एक असे ५ मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. औरंगाबाद मधील २, जालना १, बीड ५, लातूर ३, तर उस्मानाबादमधील ८ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी ८१ प्रकल्प कोरडे आहेत. त्यामध्ये बीड मधील १४, लातूरमधील ३६, तर उस्मानाबाद मधील २२ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. २६७ लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील १६, जालना २६, बीड ३५, लातूर ३९, उस्मानाबाद ११७, नांदेड २३, परभणी १०, तर हिंगोली जिल्ह्यातील एका लघु प्रकल्पाचा समावेश आहे. 

आठ मध्यम प्रकल्प तुडूंब 

जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील आठ मध्यम प्रकल्प तुडूंब झाले आहेत. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सुखणा खेळणा, गडदगड, पूर्णा नेवपूर, कोल्ही या सहा प्रकल्पांसह बीड जिल्ह्यातील महासांगवी, नांदेडमधील करडखेड या प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

Condensing Economizer : बायोगॅस ज्वलनातून मिळेल शुद्ध पाणी

Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

SCROLL FOR NEXT