चारा छावणी
चारा छावणी  
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यातील छावण्यांत ५१ हजार जनावरे दाखल

टीम अॅग्रोवन

सातारा ः जिल्ह्याच्या सर्वच भागांत पाणी व चाराटंचाई तीव्र होऊ लागली आहे. या टंचाईमुळे जिल्ह्यातील ११ तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा तर माण, खटाव व फलटण या तीन तालुक्यांत ८० चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहे. या चारा छावण्यांत लहान-मोठी मिळून ५१ हजार ४६३ जनावरे दाखल झाली आहेत. दिवसेंदिवस छावण्यात जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे.  जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांत चारा व पाणी स्थिती बिकट होऊ लागल्याने प्रशासनाकडून जनावरांसाठी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी प्रसाशनाकडून संस्थांना प्रस्ताव मागविण्यात आले होते. सुरवातीच्या काळात या संस्थांकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याने जनावरांनाचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यानंतर छावण्यासाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले होते. चाराटंचाईमुळे प्रशासनाकडून मागणी होईल तेथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यात सध्या ८० चारा छावण्या सुरू असून, यामध्ये ५१ हजार ४६३ जनावरे दाखल झाली आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक ७० चारा छावण्यांत ६,५८७ लहान, ४१,२६८ मोठी अशी एकूण ४७ हजार ८५५ जनावरे दाखल झाली आहेत. खटाव तालुक्यात आठ चारा छावण्यांत २४३ लहान, १३१९ मोठी, अशी एकूण १५६२ जनावरे दाखल झाली आहेत. फलटण तालुक्यात टंचाई तीव्र झाल्याने या तालुक्यात दोन चारा छावण्यात २९९ लहान व १४७४ मोठी, अशी एकूण २०४६ जनावरे दाखल झाली आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने टॅंकरच्या मागणीत वाढ होत आहे. जनावरे छावणीत घेऊन जाण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नसल्याने प्रतिदिन जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. चाराटंचाई भीषण असल्याने चाऱ्यासाठी सर्वाधिक उसाचा उपयोग केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT