499 licenses for sale of essential commodities during the lockdown 
मुख्य बातम्या

साताऱ्यात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी ३३९५ परवाने

टीम अॅग्रोवन

सातारा : ‘कोरोना’ संसर्ग संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक, महत्त्वाच्या व आवश्यक मालवाहतूकीस परवाना देण्याची सुविधा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सुविधेमधून जिल्ह्यात बुधवारपर्यंत परिवहन विभागाकडून ३३९५ परवाने वितरित करण्यात आले आहेत. यामुळे घरपोच भाजीपाला मिळणार असून गर्दीही टाळता येणार आहे.

देशभरात लॅाकडाऊन करण्यात आल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सर्व जनतेला व्हावा यासाठी जीवनावश्यक वस्तू वाहतूक करण्यासाठी आॅनलाइन परवाना देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. वाहतुकदारांनी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये dyrto.११-mh@gov.in व कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये mh५०drtokarad@gmail.com या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवण्याचे आवाहन केले होते. 

या अर्जाची शहानिशा करुन अशा अर्जदारांना परवान्याच्या स्कॅन कॉपी ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. या उपक्रमातून सातारा उपप्रादेशिक कार्यालयाकडून २२७२ तर कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १२२३ असे एकूण जिल्ह्यात ३३९५ परवाने वितरित करण्यात आले आहेत. हे परवाने वितरिक केल्यामुळे सातारा, कराड, फलटण या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी वाहतुकीच्या गाड्या फिरू लागल्या आहेत.

यामुळे ग्राहकांना घरात शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तू मिळू लागल्या आहेत. ग्राहकांना घरपोच शेतमाल मिळावा यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी गट सरसावले आहेत. या गटांनी वाहतुकीचे परवाने घेऊन शेतकरी ते ग्राहक असा थेट शेतमाल पोचविला जात आहे. ‘कोरोना’च्या संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला या उपक्रमामुळे प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाल्यामुळे घरातून बाहेर जावे लागत नसल्याचे ग्राहक सांगत आहेत.

जिल्ह्यात आत्तापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी ३३९५ परवाने वितरित करण्यात आले आहेत. वस्तू वाहतूक व विक्री करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे परवान्यामुळे ग्राहकांची भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू ग्राहकांना उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.  - संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT