hapus mango
hapus mango  
मुख्य बातम्या

हापूसच्या ४० हजार पेट्या थेट ग्राहकांच्या दारात 

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी तयार करण्यासाठी पणन महामंडळाच्या ऑनलाइन नोंदणीच्या प्रयोगाला सलग दुसऱ्या वर्षीही चांगला प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून हापूसचे ४० हजार पेट्या थेट ग्राहकांच्या दारात पोहोचल्या. कोरोनामुळे निर्माण झालेली ही विक्री साखळी भविष्यात बागायतदारांना उपयुक्त ठरणार आहे. 

उत्पादक, शेतकरी हे ग्राहकाला थेट शेतीमाल विक्री करू शकतील अशी यंत्रणा गतवर्षी ‘पणन’ने सुरू केली होती. त्यासाठी bs.msamb.com या वेबसाइटवर बागायतदार आणि खरेदीदार यांनी आपली नोंदणी करावयाची आहे. यामध्ये मागणी किमान शंभर बॉक्सची ठेवण्यात आली होती. या पोर्टलवर रत्नागिरी जिल्ह्यातील ३५० बागायतदारांनी थेट विक्रीसाठी नावे नोंदवली होती. यामधून दोन डझनाच्या २५ बॉक्सपासून ते हजार बॉक्सपर्यंतची मागणी खरेदीदारांनी केली होती. त्यानुसार बागायतदारांनी वाहतुकीच्या माध्यमातून तर काहींनी थेट स्वतःच्या गाडीने ग्राहकांपर्यंत हापूसचे बॉक्स पोहोचवले. यामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, बारामती, अकोल्यापर्यंत हापूस पोहोचला आहे.  कोरोनामुळे गतवर्षी वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशावेळी कृषी आणि पणन विभागाकडून बागायतदारांना हा दिलासादायक मार्ग दाखवला होता. थेट विक्रीमुळे दर्जेदार हापूसला चांगला दर मिळत असून काही मिनिटांत पैसे बँक खात्यात जमा होतात. मागणी नोंदवली की लगेचच पैसेही जमा होत असल्यामुळे थकीत राहण्याचा प्रश्‍नच उरत नाही. या पद्धतीने गतवर्षी ८० हजार बॉक्सची विक्री झालेली होती. यंदा उत्पादन कमी असले तरीही वाशी फळबाजारात हापूसचे दर कमी झाल्यामुळे थेट विक्रीचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. 

प्रतिक्रिया ‘पणन’च्या वेबसाइटवर ग्राहक किंवा शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या माध्यमातून खरेदी-विक्रीचा प्रयोग केला जात आहे. यामध्ये आंब्याचा दर किती याची माहिती ग्राहकाला मिळते. या सुविधेचा लाभ कसा घ्यावा.  - भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT