cotton procurement
cotton procurement  
मुख्य बातम्या

नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदी

टीम अॅग्रोवन

नगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५ शेतकऱ्यांकडून एकूण ४० लाख २६ हजार ४१७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. तर, लॉकडाउनच्या काळात ३३ हजार ७०८ शेतकऱ्यांकडून ८ लाख ८४ हजार १३२ क्विंटल खरेदी झाली. विभागात सर्वाधिक जळगाव व त्यापाठोपाठ नगर जिल्ह्यात कापूस खरेदी झाली. पणन महासंघामार्फत आत्तापर्यंत ४१ हजार २५ शेतकऱ्यांकडून १३ लाख १० हजार ४७१ क्विंटल, तर ‘सीसीआय’कडून ६७ हजार ५८४ शेतकऱ्यांचा १७ लाख ५३ हजार २८ क्विंटल आणि खाजगी बाजाराच्या माध्यमातून १८ हजार ५८६ शेतकऱ्यांकडून ७ लाख १२ हजार ८६२ क्विंटल तर बाजार समितीमधील अनुज्ञाप्तीधारक व्यापाऱ्यांमार्फत १० हजार १५० शेतकऱ्यांकडून २ लाख ५० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याचे विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील चापडगाव (ता. शेवगाव) कापूस खरेदी केंद्रावर लॉकडाउननंतर खरेदी सुरु झाल्यावर तेथे शेतकऱ्यांच्या कापसाची अनाधिकृतपणे मोकळ्या वाहनात वजन टाकून वजनात घट केली जात होती. याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात कापूस लुटला गेला. एका जागृत शेतकऱ्याने याबाबत व्हिडिओ व्हायरल केला होता. ‘अॅग्रोवन’नेही याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशीत केल्यावर पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार  झाली. त्यावर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवला. त्यानंतर केंद्राकडून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना तक्रार नसल्याचे लिहून घेण्याचा आग्रह करत प्रकरण दाबले. वरिष्ठांकडूनही त्याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने अनधिकृत कपातीची चौकशी झाली नाही.

जिल्हानिहाय कापूस खरेदी क्विंटलमध्ये (कंसात शेतकरी)  

  • जळगाव ः २५ लाख ५५ हजार ६५५ (७४ हजार ४९९)
  • नगर ः ५ लाख ०९ हजार ७३४ (३० हजार १५४ )
  • धुळे ः ४ लाख ५० हजार २३ (१४ हजार १५६)
  • नंदुरबार ः ४ लाख ४४ हजार ४१० (१६ हजार ६०३) 
  • नाशिक ः ६६ हजार ५९३ (१ हजार ९३३)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT