395 Farmers wait for  Kharip insurance benefits in Ratnagiri
395 Farmers wait for Kharip insurance benefits in Ratnagiri 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा लाभाची ३९५ शेतकऱ्यां‍ना प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान खरीप पीकविमा योजना सुरू केली. यंदा पूर, वादळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विमा योजनेचा लाभ घेतलेल्या ३९५ शेतकऱ्यांना या वर्षी प्रथमच विमा संरक्षण प्राप्त झाले. त्यातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यां‍ना भरपाई मिळण्याची शक्यता असून, त्याची त्यांना प्रतीक्षा आहे. 

शेतकऱ्यां‍ना पंतप्रधान पीकविमा योजनेतील तरतुदी निश्चित करताना कोकणच्या भौगोलिक स्थितीचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळाले नाही. परंतु, या वर्षी अवकाळी पावसामळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सरसकट नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याने या वर्षी ३९५ शेतकऱ्यां‍ना विमा संरक्षण मिळाले आहे. राष्ट्रीय पीकविमा योजनेतील काही निकषांमध्ये बदल करून २०१७ खरीप हंगामापासून पंतप्रधान पीकविमा योजना सुरू करण्यात आली. परंतु, नव्या योजनेतील काही तरतुदींमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे.

या वर्षी ८०९ शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. १ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. २७४.५१ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला. यातील ३९५ शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल. १३६.३५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित असून, ७२.९८ हेक्टर क्षेत्र बाधित आहे.

जिल्ह्यात ६९४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. उत्पादकता प्रतिहेक्टरी २४.७३ क्विंटल आहे. जिल्ह्यात ५० हजार कर्जदार शेतकरी आहेत. त्यांना विमा उतरविणे बंधनकारक असतानाही बहुतांश शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला नाही. 

मुदत वाढवूनही अल्प प्रतिसाद

पहिल्या वर्षी (२०१५-१६) केवळ १२९१  शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. यामध्ये दोन बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश होता. दुसऱ्या वर्षी (२०१६-१७) १४४४  शेतकऱ्यांनी, तर गतवर्षी (२०१७-१८) १९३२ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. या वर्षी मात्र मुदत वाढवूनही केवळ ८०९  शेतकऱ्‍यांनी विमा योजनेचा लाभ घेतला. त्यापैकी ३९५ शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळाले आहे. त्यात रत्नागिरीतील ६५ शेतकरी, लांजा ९, राजापूर २४, चिपळूण २२, गुहागर १५, संगमेश्वर ५०, दापोली १२६, खेड २७, मंडणगड ५७ शेतकऱ्यांना विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT