फलोत्पादन विकासासाठी होणार ३८ क्‍लस्टर 
मुख्य बातम्या

फलोत्पादन विकासासाठी होणार ३८ क्‍लस्टर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : फलोत्पादन विकासासाठी यंदा औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत समूह लागवड पद्धतीने ३८ क्‍लस्टरची निर्मिती करण्यात येणार आहे. पेरू, डाळिंब, मोसंबी, सीताफळ व आंबा यासाठीचे हे समूह असतील, अशी माहिती मिळाली.

फलोत्पादनाच्या विकासासाठी कृषी विभागातर्फे २०१९-२० साठी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार या समूहांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १७, जालना जिल्ह्यात ९, तर बीड जिल्ह्यात १२ समूहांची निर्मीती करण्यात येईल. त्यानुसार पेरूची औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, औरंगाबाद, गंगापूर, फुलंब्री तालुक्‍यांत ४, बीड जिल्ह्यातील केज व अंबाजोगाई तालुक्‍यांत २, डाळिंबाची औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर, पैठण फुलंब्री तालुक्‍यात ४ , बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यात १ समूह होईल.

मोसंबीची औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद व कन्नड तालुक्‍यांत ५, जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, अंबड घनसावंगी तालुक्‍यांत ४, तर बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, आष्टी तालुक्‍यांत ३ समूह निर्माण केले जातील. सीताफळाची औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, औरंगाबाद, पैठण व फुलंब्री तालुक्‍यात ४, जालना जिल्ह्यातील बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्‍यात ३, तर बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई व केज तालुक्‍यांत ३ समूह निर्माण केले जातील. 

आंबा पिकासाठी जालन्यात बदनापूर व अंबड तालुक्‍यांत २, बीडमध्ये पाटोदा, बीड व केज तालुक्‍यांत तीन समूह निर्माण होतील. एक क्‍लस्टर किमान ५० एकर सलग लागवडीचे असेल. क्‍लस्टरसाठी १९०० हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी पहिल्याच वर्षासाठी ६ कोटी ६५ लाखांच्या निधीची आवश्‍यकता आहे, अशी मागणी कृषी विभागातर्फे नोंदविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT