धरणसाठा
धरणसाठा  
मुख्य बातम्या

राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणी

टीम अॅग्रोवन

पुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून राज्यात पाणी संकटाची दाहकता गडद होत आहे. यातच रविवारी (ता.२) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३०५.४७ टीएमसी (२१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ३४ टक्के पाणी उपलब्ध होते. यंदा राज्यातील धरणे वेगाने रिकामी होऊ लागल्याने पुढील काळात टंचाईची भीषणता आणखी वाढणार आहे. विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात अवघे ५ टक्के आणि पूर्व विदर्भातील नागपूर विभागात १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात २५ टक्के, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक विभागात सुमारे १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात २६ टक्के आणि कोकण विभागात ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते.  गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा तब्बल १३ टक्क्यांनी कमी असून, धरणांतील पाणीपातळी कमी होण्याचा वेग अधिक असल्याने पुढील काळात ‘पाणीबाणी’ वाढणार आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे. पाण्याची वाढती मागणी, बाष्पीभवन, गळती व इतर करणांमुळे धरणांतील पाणी कमी होणार असल्याने उर्वरीत पाण्याचे काळजीपूर्वक काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. छोटे-मोठे बंधारे कोरडेठाक पडले असून, प्रमुख प्रकल्पांचा पाणीसाठा तळाशी पोचला आहे.  जिल्हानिहाय पाणीसाठ्याची स्थिती (स्त्रोत जलसंपदा विभाग - उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये) : राज्यातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता उर्वरीत ३४ जिल्ह्यांपैकी २७ जिल्ह्यांचा उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. तर ९ जिल्ह्यांमध्ये ३० ते ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यातील जिल्हानिहाय पाणीसाठ्याची स्थिती पुढील प्रमाणे :  उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षा कमी असेलले जिल्हे - नगर ६.२८, अकोला २.२५, अमरावती ७.९५, औरंगाबाद ०.९९, बीड १.३९, भंडारा २.०२, बुलढाणा १.३१, चंद्रपूर १.७४, धुळे ४.५२, गडचिरोली ०.२८, गोंदिया ६.८९, हिंगोली ०.८०, जळगाव ५.०२, जालना ०.३२, लातूर ०.९६, नागपूर ५.६३, नांदेड ७.०९, नाशिक २०.२७, उस्मानाबाद १.०५, परभणी १.३९, पुणे ३८.२३, सांगली ९.६७, सोलापूर १.२४, वर्धा २.७४, यवतमाळ १७.१६,   उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षा अधिक असलेले जिल्हे - कोल्हापूर २९.८४, नंदुरबार ५.०९, पालघर ६.२०, रायगड ४.२४, रत्नागिरी १०.७९, सातारा ६१.६६, सिंधुदुर्ग ८.८४, ठाणे २२.६५, वाशीम ९.०६.  पाणीपातळी अचल साठ्यात गेलेले प्रमुख प्रकल्प : अमरावती विभाग : खडकपूर्णा, पेनटाकळी (बुलडाणा). औरंगाबाद विभाग : जायकवाडी (औरंगाबाद), मांजरा, माजलगाव (बीड), येलदरी, सिद्धेश्वर (हिंगोली), निम्नतेरणा, सिना कोळेगाव (उस्मानाबाद), निम्न तेरणा (परभणी). नागपूर विभाग : गोसखुर्द (भंडारा), दिना (गडचिरोली). नाशिक विभाग : भाम धरण, पुणेगाव (नाशिक).  पुणे विभाग : घोड, पिंपळगाव जोगे, टेमघर (पुणे), उजनी (सोलापूर),  अचल साठ्यात २२९ टीएमसी पाणी सर्व प्रकल्पांचा एकूण अचल पाणीसाठा (मृत पातळी) २७५.६८ टीएमसी आहे. रविवारी (ता. २१) धरणांच्या अचल पातळीत २२९.१७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर उपयुक्त (चल पातळीत) असलेल्या ३०५.४७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. सर्व धरणांचा चल आणि अचल पाणीसाठा मिळून १७१९.७९ टीएमसी असून, यापैकी ५३६.५४ टीएमसी (३१.२) टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT