ethanol.jpg
ethanol.jpg 
मुख्य बातम्या

कारखान्यांकडून इथेनॉलचे ३०२ कोटी  लिटर पुरवठ्याचे करार 

Raj Chougule

कोल्हापूर : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल कंपन्या बरोबर ३०२ कोटी लिटरचा करार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल ७० टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी १७८ कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना पुरवण्यात आले होते. यंदा करार केलेल्या इथेनॉल पैकी ११७ कोटी लिटर इथेनॉल कंपन्यांना पोच करण्यात आले आहे. 

यंदा केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना प्रोत्साहन दिले आहे. नवीन प्रोजेक्ट उभे करण्यासाठी आर्थिक मदत ही केली आहे. इथेनॉलच्या दरात वाढ करून कारखान्यांना फायदेशीर भूमिका घेतली आहे. यामुळे ऊस उत्पादक राज्यांतील कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीला बळ दिले आहे. सुरुवातीच्या काळात साठवणक्षमता नसल्याने इथेनॉल पोहोच करणे कारखान्यांना अशक्य बनले होते. आता यात सुधारणा होत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. 

गेल्या हंगामात इथेनॉलच्या निर्मितीमुळे ८ लाख टन साखरेचे उत्पादन कमी झाले होते. यंदा अनेक कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य दिल्याने २० लाख टनांपर्यंत साखर कमी उत्पादित होईल, असा अंदाज उद्योगातील सूत्रांचा आहे. साखरेच्या तुलनेत इथेनॉलची विक्री सुलभ असल्याने यंदा कारखान्यांना त्याचा फायदा होईल, अशी शक्यता इंडियन शुगर मिल्सच्या (इस्मा) सूत्रांनी व्यक्त केली. 

देशातील हंगाम अंतिम टप्यात आला आहे. एप्रिल महिन्याअखेर देशात २९९.१५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. ११२ कारखाने सुरू आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात अजून हंगाम सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कारखाने पावसाळा सुरू होईलपर्यंत सुरू राहतील, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रातील हंगाम आणखी पंधरा दिवसांत संपुष्टात येण्याची शक्यता, साखर कारखान्यांच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  थेट रसापासून मोठी निर्मिती  अजून एक महिना तरी देशातील हंगाम चालेल अशी शक्यता आहे. यामुळे इथेनॉलची निर्मिती अजूनही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. यंदा ऊस रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून ७७ टक्के इथेनॉल तयार करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, बिहार, हरियाना, पंजाब, दिल्ली आदी राज्यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण दहा टक्क्यांपर्यंत करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. देशाचे सरासरी उद्दिष्ट ७.३६ टक्क्यांपर्यंत गेले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT