30,000 complaints regarding seeds: Agriculture Minister Bhuse
30,000 complaints regarding seeds: Agriculture Minister Bhuse 
मुख्य बातम्या

सोयाबीन बियाणेप्रकरणी ३० हजार तक्रारी ः कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा हा आकडा राज्यात ३० हजारांच्या जवळपास असून यापैकी ५० ते ६० टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी बियाणे उगवण संदर्भातील तक्रारींबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यात दोषी कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला.

शिवपुरी (ता. कळंब) येथे कृषी संजीवनी सप्ताहअंतर्गत शेतकरी संवाद, रोप वाटप व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या वेळी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, श्रीधर मोहोड, विजू राठोड, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक सुभाष नागरे, दुलिचंद राठोड, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. कपाशीच्या बीटी-३ वाणाला परवानगी देण्याची मागणी केली असता कृषिमंत्री म्हणाले, की कापूस बीटी-३ हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारित येतो. या वाणाचा पर्यावरणीयदृष्ट्या काय परिणाम होतो, याबाबत संशोधन सुरू आहे.

दोषी आढळल्यास ‘महाबीज’वरही कारवाई राज्यासह यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे उगविले नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास खासगी कंपन्यांसह महाबीज महामंडळावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT