district bank
district bank 
मुख्य बातम्या

पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) ३१ मार्चऐवजी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरण्यासाठी बॅंकेच्या शाखांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. 

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असताना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. अशातच पीक कर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च असल्याने अनेक शेतकरी जिल्हा बॅंकेच्या बाहेर गर्दी करून भरणा करत होते. या गंभीर परिस्थितीची माहिती ‘आरबीआय’पर्यंत पोहचल्याने निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या २६६ हून अधिक शाखांमार्फत गाव पातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना दिला. बँकेकडून तीन लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर तीन लाखाहून अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप केले. चालू वर्षी खरीपात एक लाख ४८ हजार ३६६ शेतकऱ्यांना एक हजार १२८ कोटी ४२ लाख ४ हजार, तर रब्बीत ४३ हजार ३१७ शेतकऱ्यांना २४० कोटी ३३ लाख ६९ हजार रूपयांचे वाटप केले आहे. 

बॅंकेने दिलेले कर्ज शेतकरी ३१ मार्चच्या अगोदर भरत असतात. मोठे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज भरले नाही, तर व्याज व दंड भरावा लागतो. त्यामुळे शेतकरी मार्च महिना संपण्याच्या अगोदर बॅंकेत कर्ज भरण्यासाठी गर्दी करत होते. परंतु जमावबंदी असल्याने शेतकऱ्यांना बॅंकेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागत होते. त्यामुळे पीक कर्जाबाबत सरकारच्यावतीने ताबडतोब आदेश काढल्याने शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  -------------  कोट  पीक कर्जाची रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती. मात्र शेतकरी गर्दी करत असल्याने ही मुदत वाढवून ३० जूनपर्यंत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी तीन महिने मिळणार असून ज्यांनी कर्ज भरले आहे त्यांना ३१ मार्चनंतर कर्ज वाटप सुरू होईल.  - प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT