30 crore for VSI's Jalna center
30 crore for VSI's Jalna center 
मुख्य बातम्या

‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटी

टीम अॅग्रोवन

पुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या जालना येथील नव्या ऊस संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) बैठकीत मान्यता देण्यात आली. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी संशोधनाचा विविधांगी आढावा घेतला. 

 व्हीएसआयच्या कार्यकारी परिषदेची बैठक सोमवारी (ता. २१) मांजरीच्या मुख्यालयात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी चर्चेत भाग घेतला. 

मराठवाडा, विदर्भासाठी स्वतंत्र ऊस संशोधन केंद्र सुरू होण्यासाठी श्री. पवार यांचा गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळेच गेल्या २२ फेब्रुवारीला या केंद्रासाठी १२८ एकर जागा राज्य शासनाने व्हीएसआयकडे वर्ग केली. तेथे आता १३ एकरांवर ऊस लागवडदेखील करण्यात आली आहे. ‘‘अत्यावश्यक संशोधनाच्या सर्व सुविधा नव्या केंद्रात उभाराव्यात,’’ असे श्री. पवार यांनी या वेळी सूचित केले.  

व्हीएसआयच्या इतर संशोधनाला चालना द्यावी. तसेच विविध उत्पादने येत्या पाच वर्षांत नियोजनात्मक वाढवावी, असेही निश्‍चित करण्यात आले. संशोधन व इतर भांडवली कामांसाठी येत्या पाच वर्षांत ७१ कोटी रुपयांची कामे व्हीएसआय करणार आहे. या कामांची बारकाईने माहिती घेत श्री. पवार यांनी प्रकल्पनिहाय भांडवली खर्चाला हिरवा कंदील दिला. माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ तसेच इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

साखर आयुक्त लिखित पुस्तकाचे प्रकाशन मांजरी येथील व्हीएसआय, अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सोमवारी (ता. २१) झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड व सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘साखर उद्योगातून इथेनॉलनिर्मिती आणि त्याचे एफआरपीवरील परिणाम’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. साखर आयुक्तांनी या वेळी श्री. पवार यांना इथनॉलनिर्मितीच्या अनुषंगाने काही मुद्द्यांचा आढावा घेणारे पत्र सादर केले. त्याचे वाचन श्री. पवार यांनी करीत या पुस्तिकेच्या निमित्ताने ‘अभिनंदनीय’ असा अभिप्रायदेखील दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT