28 percent of Rabi sowing in Nanded district
28 percent of Rabi sowing in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात रब्बीची अठ्ठावीस टक्के क्षेत्रावर पेरणी

टीम अॅग्रोवन

नांदेड : ‘‘जिल्ह्यात चालू आठवड्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीने गती घेतली आहे. गुरुवारी (ता. २१) पर्यंत ३९ हजार २३३ हेक्टरवर (२८.७० टक्के) पेरणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारीचे २६ हजार ९७५ हेक्टर, गव्हाचे ३८ हजार ५३८ हेक्टर, मक्याचे ३ हजार १७६ हेक्टर, हरभऱ्याचे ६२ हजार ३५९ हेक्टर, करडईचे ४ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीनच्या काढणीची कामे रखडली. जमिनीत पाणी साचून राहिल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना उशीर झाला. पावसाने उघडीप दिल्यानंतर वाफश्‍यावर आलेल्या जमिनीवर पेरणीची लगबग सुरू आहे. 

शेतकरी रब्बी पिकांची वेळेवर पेरणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या आठवड्यामध्ये पेरणीच्या कामांनी गती घेतली आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात ३९ हजार २३३ हेक्टरवर (२८.७० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली. यंदा विहिरी तसेच मोठे, मध्यम, लहान सर्वच प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून  हरभरा, गहू या पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.

गुरुवार (ता. २१) पर्यंतची पीकनिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक पेरणी क्षेत्र  टक्केवारी
ज्वारी १४१२ ५.२३
गहू १९५२ ५.०७
हरभरा ३४९८३  ५६.११
करडई ३८८  ८.१४
मका ४७८ १५.०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT