2.79 lakh Vaccination of animals in Nanded
2.79 lakh Vaccination of animals in Nanded  
मुख्य बातम्या

नांदेडमध्ये पावणेतीन लाख जनावरांचे लसीकरण

टीम अॅग्रोवन

नांदेड ः ‘‘लाळ्या खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यात येते. यंदा २८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ३०० जनावरांना लाळ्या-खुरकूत लस देण्यात आली,’’ अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या १७८, तर जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सहा अशा एकूण १८४ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून  हे लसीकरण पूर्ण केले आहे. लसीकरणासोबतच पशुपालकांना जनावरांच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केले. 

डॉ. रत्नपारखी म्हणाले, ‘‘लाळ्या-खुरकुताची लागण झाल्यानंतर जनावर हे शांत राहते. नियमितपणे चारा खात नाही. पाणी पिणे बंद करते. तर दुभते जनावर असेल, तर दुधाचे प्रमाणही कमी होते. या काळात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जिभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते. पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात. गाभण जनावराच्या मागच्या पायात हे फोड आले, तर अपंगत्वसुद्धा येऊ शकते. या आजाराची साथच सुरू असेल, तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. आजारी जनावराचा चारा निरोगी जनावराला देऊ नये. पाण्याची स्वतंत्र सोय करावी. अजारग्रस्त जनावरे बांधलेली जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावीत.जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यतो होत नाही. लसीकरण हे सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे’’, असे डॉ. रत्नपारखी म्हणाले.

जिल्ह्यातील जनावरांना सध्या कोणताही संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव नाही. परंतु पशुपालकांनी वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. या सोबतच जनावरांचे टंगिंगही करून घ्यावे. - डॉ. मधुसूदन रत्नपारखी, पशुसंवर्धन उपायुक्त, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’चा बोजा ग्राहकांच्या खांद्यावरच

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला वळवाचा तडाखा, पूर्व, दक्षिण भागात जोरदार पाऊस

Green Hydrogen : दिशा ‘हायड्रोजन हब’ची

Heavy Rain : पावसामुळे पाईट येथे घरे, पॉलिहाउसला फटका

SCROLL FOR NEXT