250 acres of sorghum crop destroyed in the Dhebewadi valley
250 acres of sorghum crop destroyed in the Dhebewadi valley 
मुख्य बातम्या

ढेबेवाडी खोऱ्यात रानडुकरांकडून ज्वारीचे २५० एकरातील पीक फस्त

टीम अॅग्रोवन

ढेबेवाडी, जि. सातारा : रानडुकरे आणि गव्यांच्या कळपांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे. महिनाभरातच सुमारे २५० एकरातील रब्बी ज्वारीचे पीक त्यांनी फस्त केल्याचे वनविभागाकडे आलेल्या तक्रारीतून स्पष्ट होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची स्थिती आभाळ कोसळल्यासारखी झाली आहे. 

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या डोंगर भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला रामराम ठोकल्याने पडीक क्षेत्र वर्षागणिक वाढत आहे. जवळपास खाद्य उपलब्ध होत नसल्याने वन्यप्राण्यांनी आजूबाजूच्या सपाटीच्या गावांकडे मोर्चा वळविला आहे. तेथील शेती वाचवतानाही शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. 

काळगाव परिसरात सध्या गव्यांचा, तर ढेबेवाडी खोऱ्यात रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रब्बी ज्वारीचे पीक काढणीला आले असतानाच शिवाराच्या शिवारे रातोरात फस्त होऊ लागल्याने शेतकऱ्यांची अवस्था तोंडचा घास हिरावल्यासारखी झाली आहे. खरिपाच्या ऐन पीक काढणीच्या वेळेलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे संकरित ज्वारीचे उभे पीक जागेवरच अंकुरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी ज्वारीवरच होत्या. मात्र, वन्यप्राण्यांचा उपद्रवाने हा हंगामही वाया गेल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. 

दिवसभर राखणी करून आणि रात्रभरही जागता पहारा देऊन गवे व डुकरे जुमानत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतकऱ्यांची शिवारे गावापासून खूपच लांब आणि आडवळणाच्या ठिकाणी आहेत. रात्री तेथे राखणीला थांबणे शक्‍य होत नाही. तर, सकाळी भुईसपाट झालेले शिवारच त्यांच्या दृष्टीला पडत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

Condensing Economizer : बायोगॅस ज्वलनातून मिळेल शुद्ध पाणी

Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

SCROLL FOR NEXT