मुख्य बातम्या

जालना जिल्ह्यात २५ गायी मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा

जालना : जालना तालुक्यातील ईदेवाडी व सिरसवाडी शिवारात सुमारे २५ गायी शनिवारी (ता. ११) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. फोरएट नावाचे विषारी औषध खाल्ल्याने गायींचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज आहे.

शनिवारी सकाळी ईदेवाडी शिवारात सकाळी २० ते २५ गायी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यानंतर नागरिकांनी या संदर्भात पोलिस प्रशासनासह जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, महसूल प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, तहसीलदार बिपीन पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी जे. एम. बुकतारे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटना स्थळीच गाईचे शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

SCROLL FOR NEXT