200 MW solar project in Marathwada: Chief Minister Thackeray
200 MW solar project in Marathwada: Chief Minister Thackeray 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः मुख्यमंत्री ठाकरे

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २०० मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प सोबतच हिंगोलीत साडेचार कोटी खर्चून हळद प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या १९४.४८ किलोमीटरच्या जालना- नांदेड महामार्गाला गती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थानिक सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.

श्री. ठाकरे म्हणाले, की जुलमी निजामाच्या विरोधात लढा देऊन मराठवाडा काही अपेक्षेने देशात सहभागी झाला. ७५ वर्षांत सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या असे नाही. कोरोनासोबत लढा देत असतानाच मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक कामांची मुहूर्तमेढ रोवली आहे. संतभूमी म्हणून पैठणला संतपीठ सुरू होत आहे. हे संतपीठ केवळ प्रेक्षणीय स्थळ न होता जागतिक दर्जाचे विद्यापीठ व्हावे. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला पण आजही निजामकालीन शाळा आहेत. ही मराठवाड्याची वैभव सांगणारी परंपरा होऊ शकत नाही. त्यामुळे या खुणा पुसून टाकण्यासाठी अशा शाळांचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे सांगून कामाची यादीच त्यांनी वाचून दाखविली. 

कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, पालकमंत्री अनिल देसाई, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, अंबादास दानवे, प्रशांत बंब, प्रा. रमेश बोरणारे, मनिषा कायंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कामे 

  • औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाला चालना 
  • औरंगाबाद-शिर्डी हवाई सेवेची चाचपणी 
  • सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:स्सारणासाठी ३८२ कोटी रुपये 
  • शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७.२२ कोटी रुपये 
  • शहरातील १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजना 
  • सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार 
  • औरंगाबाद-शिर्डी या ११२.४० किलोमीटर मार्गाची श्रेणीवाढ 
  • बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन 
  • शहरातील गुंठेवारी नियमित करणे 
  • घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास वाढीव २८ कोटी रुपये खर्च 
  • हिंगोलीतील दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी 
  • हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग. ४.५० कोटी 
  • औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकासासाठी ८६.१९ कोटी. 
  • नरसी नामदेव मंदिर परिसराच्या विकासाठी ६६.५४ कोटी.   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

    Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

    Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

    Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

    Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

    SCROLL FOR NEXT