वैयक्तिक लाभ योजनांचे २ हजार ८०९ अर्ज मंजूर
वैयक्तिक लाभ योजनांचे २ हजार ८०९ अर्ज मंजूर 
मुख्य बातम्या

वैयक्तिक लाभ योजनांचे २ हजार ८०९ अर्ज मंजूर

टीम अॅग्रोवन

पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून राबविण्यात येणारी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दोन हजार ८०९ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. यातील अपात्र उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (ता. ५) मुदत देण्यात आली आहे. तर प्रस्ताव मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वस्तू खरेदीसाठी सूचना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके यांनी दिली.

ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या व्यवसाय करता यावा, तसेच व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांना व्यवसायाभिमुख वस्तू म्हणून शेवई मशिन, शेळी पालन आणि ब्युटीपार्लरचे साहित्य देण्यात येणार आहे. तसेच एमएससीआयटी झालेल्या मुलींना आणि बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलींना अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये शेवई मशिनसाठी ७७० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्यामध्ये सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या इंदापूर, दौंड, जुन्नर भागांतील आहे.

शेळीपालन योजनेतून प्रत्येक लाभार्थ्याला दोन शेळी आणि एक बोकडसाठी अनुदान देण्यात येणार असून, त्यासाठी १ हजार २३७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक इंदापूरमध्ये ३८८ लाभार्थी आहेत. तसेच ब्युटीपार्लर साहित्यासाठी ३४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. संगणक आणि विशेष प्रावीण्यासाठी प्रत्येकी ४०९ आणि ५० प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून, निधीही वाढवण्यात आला आहे. तालुका आणि गावपातळीवर अधिकारी, सदस्य यांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देऊन अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना अनुदान थेट लाभ पद्धतीने (डिबीटी) देण्यात येणार असून, बहुतांश विभागाचे काम अंतीम टप्प्यात अाहे. - विश्‍वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT