बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्ज
बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्ज 
मुख्य बातम्या

करमाळा बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्ज

टीम अॅग्रोवन

करमाळा, जि. सोलापूर  : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्यासाठी सोमवारी (ता.१३) शेवटच्या दिवशी ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण १८ जागेसाठी एकूण १८६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मारुती बोरकर यांनी दिली. पहिल्यांदाच करमाळा तालुक्‍यातील शेतकरी आपल्या पसंतीचे संचालक मंडळ निवडणार आहेत.

पणन विभागाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळाल्यानंतर यापूर्वी जिल्ह्यात सोलापूर आणि बार्शी बाजार समितीसाठी निवडणूक झाली. आता करमाळ्यात त्यासाठी चुरस रंगणार आहे. आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्रितपणे तर माजी आमदार बागल गट आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे स्वतंत्रपणे अशी तिरंगी लढत शक्‍य आहे; पण आता भाजपही चौथे पॅनेल निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे समजते. पण हे सगळे चित्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी समजणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार व गण : माजी आमदार जयवंतराव जगताप (केम), ‘आदिनाथ''च्या संचालिका रश्‍मी बागल (रायगाव, पोथरे) ‘मकाई''चे अध्यक्ष दिग्विजय बागल (पोथरे, कंदर, वांगी), ‘आदिनाथ''चे माजी संचालक नवनाथ झोळ, चंद्रकांत सरडे, तानाजी झोळ (वाशिंबे), आमदार नारायण पाटील यांचे बंधू राजू पाटील, राजकुमार देशमुख, विलास पाटील (वांगी), देवानंद बागल (वीट, पोथरे), चिंतामणी जगताप, दीपक चव्हाण (हिसरे), प्रा. शिवाजीराव बंडगर (झरे), अजित तळेकर (केम), माजी सभापती बापूसाहेब पाटील, सूर्यकांत पाटील, बंडू टापरे (राजुरी), डॉ. अमोल घाडगे, सुनील सावंत (पोथरे), मधुकर गाडे, बिभिषण आवटे, डॉ. श्रीराम जाधव, रघुनाथ ढेरे, हनुमंत ढेरे, अण्णा शिंगाडे, कांतीलाल चोपडे, शहाजी माने (वीट), माजी उपसभापती संजय जाधव, महादेव श्रीखंडे, काशीनाथ काकडे, अप्पा शेरे (सावडी), दत्ता जाधव, वसंत आंबारे (साडे) आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. उद्या (मंगळवारी) उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT