In 172 circles in Marathwada Frequent, light rain
In 172 circles in Marathwada Frequent, light rain 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील १७२ मंडळांत तुरळक, हलका पाऊस

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आठही जिल्ह्यातील जवळपास १७२ मंडळांत गुरुवार (ता.१८) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने तुरळक ते हलक्‍या स्वरूपाची हजेरी लावली.

नांदेड जिल्ह्यातील २८ मंडळांत, तर बीड २५, लातूर ४४, उस्मानाबाद २७, औरंगाबाद २४, जालना २०, परभणी ३, तर हिंगोली जिल्ह्यातील एका मंडळात गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात तुरळक, हलका, तर काही ठिकाणी मध्यम पावसाची हजेरी लागली. 

नांदेड जिल्ह्यातील सगरोळी मंडळात १४ मिलिमीटर जहूर १६.७५, माळाकोळी १४.२५, बीड जिल्ह्यातील गेवराई मंडळात १६.२५, मादळमोही १३.३०, जातेगाव २२ ,पाचेगाव १७.२५, धोंडराई १४.५०, उमापूर १२.७५, सिरसदेवी २१, रेवडी २०, तलवाडा १७, लातूर जिल्ह्यातील हलगरा मंडळात १६. २५ मिलिमीटर, औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा मंडळात १२.५०, लाडगाव ५८, वाळूज १७.७५, लोहगाव ११.७५, कांचनवाडी ३०.७५, जालना जिल्‍ह्यातील कुंभार पिंपळगांव ११.५०, अंतरवली ३६.२५, तर परभणी जिल्ह्यातील बनवस मंडळात २१.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

Kharif Season : खरिपाचे क्षेत्र पावणेतीन हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT