1600 crore for Sant Tukaram Maharaj Palkhi Marg 
मुख्य बातम्या

संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी १६०० कोटी

सोलापूर ः ‘‘संत तुकाराम महाराज पालखी महामार्गातील इंदापूर ते बोंडले या ४७ किलोमीटरच्या कामासाठी भारतमाला योजनेतून १ हजार ६०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः ‘‘संत तुकाराम महाराज पालखी महामार्गातील इंदापूर ते बोंडले या ४७ किलोमीटरच्या कामासाठी भारतमाला योजनेतून १ हजार ६०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे तसे पत्र आले आहे’’, अशी माहिती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

मोहिते पाटील म्हणाले, ‘‘इंदापूर ते अकलूज आणि बोंडले या ४७ किलोमीटरच्या पालखी महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. या पालखी महामार्गावरील अनेक विवादित मुद्दे सोडवण्यात आले आहेत. इंदापूर जवळील किलोमीटर ८३.५०० ते बोंडले येथील किलोमीटर १३०.२०० या ४६ किलोमीटर ७०० मीटरच्या अंतरातील पालखी महामार्गासाठी केंद्राच्या भारतमाला योजनेतून १ हजार ६०१ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.’’ 

‘गडकरी यांचे आभार’

या कामाला लवकरच सुरुवात होईल, असेही या पत्रात नमूद केले आहे. गडकरी यांनी या कामी विशेष लक्ष घालून निधीचा प्रश्न मार्गी लावला आहे, आम्ही त्यांचे आभारी आहोत, असेही  मोहिते पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT