15,000 hectare crop loss in Amravati division
15,000 hectare crop loss in Amravati division 
मुख्य बातम्या

अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसत आहे. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. शनिवारी (ता. ८) व रविवारी (ता. ९) अमरावती विभागातील अकोला व अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस, गारपीट झाली. त्याच्या परिणामी या दोन्ही जिल्ह्यांत १५ हजार ८२७ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.  खरिपानंतर रब्बी हंगामातही संकटांनी शेतकऱ्यांचा जणू पिच्छाच पुरविला आहे. खरिपात तर पाण्याची संततधार असल्याने अनेक शेतकऱ्यांना एकरी एक किलोची उत्पादकतादेखील झाली नाही. कापसावरदेखील बोंड अळी, बोंडसडचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी मार बसला. उत्पादकता घटल्याच्या परिणामी यंदा कापसाचे दरात तेजी अनुभवली जात आहे. खरिपातील संकटानंतर आता रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २८ डिसेंबर २१ रोजी अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस, गारपिटीचा नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आठ व नऊ जानेवारी २०२२ ला पुन्हा अवकाळी पाऊस तर काही भागांत गारपीट झाली. अमरावती विभागातील पाचपैकी अकोला व अमरावती या दोनच जिल्ह्यांत यामुळे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणांती समोर आले आहे. त्यामध्ये अमरावती तालुक्‍यील चार तालुक्‍यांत ९६ गावांमध्ये १४ हजार ८३० हेक्‍टरवरील पीक नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील एका तालुक्‍यात सहा गावांमध्ये ९९७ हेक्‍टर क्षेत्रावरील पीक नुकसान झाले. यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसानीची नोंद नाही.  अमरावती बाधित पिके ः

तूर, कापूस, हळद, कांदा, गहू, भाजीपाला, हरभरा, संत्रा, केळी, पपई. 

अकोला बाधित पिके ः तूर, कापूस, गहू, हरभरा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT