रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढला
रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढला 
मुख्य बातम्या

रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढला

टीम अॅग्रोवन

सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या रायवाडी लघुपाटबंधारे तलावातून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवाय योजनेतून गेल्या दोन महिन्यांत १५ हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी आशा आहे. 

सन १९७२ मध्ये रायवाडी लघुपाटबंधारे तलाव बांधण्यात आला. या तलावाची पाणी साठवण क्षमता ९८ दशलक्ष घनफूट इतकी आहे. या तलावाच्या परिसरात सुमारे सात गावांतील शेतीला पाणीपुरवठा होतो. ४७ वर्षांत प्रथम हा तलाव कोरडा पडला आहे. यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.  हा तलाव एकदा भरला की, तीन ते चार वर्षे यातील पाणी पातळी कमी होत नाही. मात्र, मागील काही वर्षांपासून रायवाडी तलाव पाणलोट क्षेत्रात कमी झालेले पर्जन्यमान, मोठ्या प्रमाणात होणारा पाणी उपसा यामुळे गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. तर चालू वर्षी जानेवारीतच हा तलाव कोरडा पडला होता. 

राज्य शासनाने कोरडे पडलेले तलाव, धरणे, नद्या, अशा जलस्तोत्रातील गाळ काढणे व पाणीसाठा वाढविण्याचा निर्णय घेतला. या आदेशाची अंमलबजावणी कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयाने रायवाडी तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू केली. या तलावातील सुमारे ५६ हजार घनमीटर गाळ काढण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सध्या गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता ६८ दशलक्ष घनमीटर असून १७ दशलक्ष घनमीटर मृत संचय पाणीसाठी आहे. पण गाळामुळे हा मृत संचय साठा ७ ते ८ घनमीटर इतका कमी झाला आहे. गाळ काढल्याने १० ते १२ घनमीटर पाणीसाठा वाढविणे शक्य झाले आहे. 

नागज कालव्यातून रायवाडीसाठी पाणी न्यावे  सध्या टेंभू योजनेच्या नागज कालव्यातून पाणी दुधेभावी तलाव तसचे पुढे सोडण्यात आले आहे. रायवाडी तलावातून नागज, आरेवाडी या दोन गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांची पाइपलाइन टाकलेली आहे. तसेच काही खासगी शेतकऱ्यांच्या पाइपलाइन तलावातून आल्या आहेत. त्यांचा वापर करून प्रशासनाने टंचाई परिस्थितीची तातडीची गरज म्हणून हे पाणी रायवाडी तलावात नेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. नागजच्या कालव्यातून रायवाडी तलावात टेंभूचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT