15 lakh for PM and CM aid fund from Kothari Group
15 lakh for PM and CM aid fund from Kothari Group 
मुख्य बातम्या

कोठारी ग्रुपतर्फे पंधरा लाखांचा मदत निधी

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः कोरोना संकटात प्रशासनाला मदत व्हावी, यासाठी येथील कोठारी ग्रुप्सच्या कर्मचारी व व्यवस्थापनाच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी १५ लाख रुपये मदतनिधी देण्यात आला. 

मदतीचा धनादेश नुकताच कंपनीचे संचालक आशिष कोठारी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपूर्त केला. २३ मार्चपासून देशात लॅाकडाऊन जाहीर झाला आहे. त्या दिवसापासूनच कोठारी ग्रुप्सने आपली सर्व युनिट्स बंद ठेवून सामाजिक आवाहनाला प्रतिसाद दिला. 

तसेच लॅाकडाऊन कालावधीत अन्नधान्याची जमवाजमव करू न शकलेल्या मोहोळ शहरातील २०० कुटुंबीयांना ग्रुपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर देशवासीय एकत्र येतील व संकटाचा मुकाबला करतील. तसेच कोरोनाला देशातून हाकलून लावतील, असा विश्वास यावेळी श्री. कोठारी यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला कोठारी ग्रुप्सने सहकार्य करत आपला वाटा उचलत १५ लाख रुपयांची मदत दिली. त्यानुसार ही मदत दिल्याचे त्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT