तूर
तूर  
मुख्य बातम्या

तुरीला हमीभावापेक्षा १३०० रुपयांपर्यंत कमी दर

टीम अॅग्रोवन

अकोला : या हंगामात लागवड केलेल्या तुरीची लवकरच बाजारात अावक होऊ घातली असताना, सध्या मात्र सर्वत्र हमीभावापेक्षा सरासरी हजार ते १३०० रुपयांपर्यंत कमी दर मिळत अाहे. हे दर लक्षात घेता तूर खरेदीच्या दृष्टीने तातडीने प्रक्रिया करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली अाहे.    या हंगामासाठी शासनाने तुरीची अाधारभूत किंमत ५६७५ रुपये जाहीर केलेला अाहे. सद्यःस्थितीत तुरीला ४००० ते ४९०० या दरम्यानच भाव मिळत अाहे. सरासरी ४२०० ते ४३०० रुपयांचा दर शेतकऱ्यांच्या हातात पडत अाहे. बाजार समित्यांमध्ये काही ठिकाणी नवीन तुरीची अावक सुरू झाली अाहे. येत्या १५ दिवसांत तुरीची अावक अाणखी वाढणार अाहे. बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून तुरीची खरेदी सध्या चार हजार ते ४९०० पर्यंत केली जात अाहे. नवीन तूर अाल्यास हे दर किती प्रमाणात टिकतील हे मात्र कुणीही स्पष्ट सांगायला तयार नाही. गेल्या हंगामात नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी झाली होती. याही वेळी खरेदीच्या दृष्टीने केंद्र उघडण्याची गरज व्यक्त होत अाहे. यंत्रणांनी संस्थांकडून प्रस्ताव मागवले अाहेत. हे प्रस्ताव शासनाकडे पाठवून अंतिम केले जातील. दुसरीकडे विक्रीसाठी अाॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणे अावश्यक अाहे. अद्याप या दृष्टीने शासनाकडून सूचनांची जिल्हा यंत्रणांना प्रतीक्षा अाहे. 

प्रतिसादाबाबत साशंकता या मोसमात शासनाने अातापर्यंत मूग, उडीद, सोयाबीन, भरडधान्य खरेदी सुरू केली. यासाठी अाॅनलाइन पद्धतीने नावनोंदणी करण्यात अाली. नोंदणीला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला. परंतु विक्रीसाठी प्रत्यक्षात धान्याची अावकच पुरेशा प्रमाणात झालेली नाही. हजारो क्विंटल धान्य खरेदी होणाऱ्या केंद्रावर यंदाच्या खरेदीचा अाकडा अत्यल्प अाहे. तुरीच्या संदर्भातही अशीच शक्यता यंत्रणांमधील अधिकाऱ्यांना वाटत अाहे.

दरावर नियंत्रणासाठी खरेदी प्रक्रियेची गरज खुल्या बाजारात तुरीला किमान अाधारभूत किमती इतका ५६७५ रुपये भाव मिळण्यासाठी खरेदी केंद्र सुरू होणे अावश्यक अाहे. खुल्या बाजारातील दर लक्षात घेता शेतकऱ्यांना या केंद्राचा पर्याय उपलब्ध राहील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT